रावेर, (विनोद कोळी) : येथे पहिला कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या 58 वर्षीय वृद्धाचा आज जळगाव येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे.
रावेर शहरात पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह ५८ वर्षीय रूग्ण आढळून आला होता.या रुग्णावर रावेर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असतांना रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याने जळगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. या रूग्णावर जळगाव येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू असतांना आज 23 रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या वृत्ताला रावेर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांनी दुजोरा दिला आहे. मयताच्या संपर्कात आलेल्यांना आधीच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.















