Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर तालुक्यातील ३४ सरपंचांना ‘अपात्र का कारण्यात येऊ नये ‘ बाबत नोटीसा

najarkaid by najarkaid
September 26, 2021
in Uncategorized
0
रावेर तालुक्यातील ३४ सरपंचांना ‘अपात्र का कारण्यात येऊ नये ‘ बाबत नोटीसा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) दि.२६-: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्या येथे ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी व ग्रामसेवकांनी त्यांच्या गावातील दलित वस्ती विकास कामांची इ-निविदा प्रक्रियेत अनियमितता केली म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवत सरपंचांना अपात्र करण्याची आणि ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटिसा प्राप्त झाल्याची माहिती आहे. यामुळे चांगलीच खळबड उडाली आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी उपाध्यक्ष श्री नंदकिशोर महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेच्या इ -निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समिती मध्ये तालुक्यात झालेल्या अनुसूचित जाती जामतीतील नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधील विकास कार्यक्रमांतर्गत इ-निविदांमध्ये अनियमिततेबाबत चौकशीकेली गेली होती.

या समितीचा अहवाल ९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना या बाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले की ई-निविदा पात्र नसताना सुध्दा त्या पात्र केल्या म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम क्रमांक ३८ चा भंग केला गेला म्हणून आपल्यावर अपात्रतेची कार्यवाही का केली जाऊ नये..? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला असून याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसाच्या आत सादर करावा, खुलासा वेळे प्राप्त न झाल्यास किंवा संयुक्तिक नसल्यास अपात्रतेची कारवाई आपल्यावर करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची या नोटीशीवर सही आहे. १९ सप्टेंबरला जिल्हा परिषद येथून निघालेल्या या नोटिसा शुक्रवारी २४ ला पंचायत समितीच्या माध्यमातून संबंधित सरपंचांना दिले आहे.
या सर्व ३४ गावांच्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनाही नोटीस दिली गेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियमांचा भंग झाला म्हणून आपल्यावर ही शिस्तभंगाची कारवाई का करू नये,
असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ग्रामसेवकांनाही दहा दिवसांच्या आत नोटिसला उत्तर देण्यास बोलले आले आहे. या चौकशीनंतरही सरपंच आणि ग्रामसेवकांवरील होणारी संभाव्य कारवाई किरकोळ स्वरूपाची होणार असल्याचे सत्ताधारी भाजपच्या गटातून बोलले जात आहे. पण, आता अपात्रतेच्या शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचमुळे नोटिसा मिळाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यामधून फक्त कळमोदा गावातिल ग्रामपंचायतीची ई निविदा प्रक्रिया योग्य असल्याचे चौकशी समितीने सांगितले आहे.
सरपंचांनी नोटिशीला दिलेल्या उत्तरावर त्यांच्यावर काय कारवाई होईल, हे आयुक्त (नाशिक) ठरवतील. – डी. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांनी सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्या राज्याला गुलाब चक्रीवादळ झोडपणार…

Next Post

राज्यात पुढील तीन दिवस कोसळधार : ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला इशारा

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
राज्यात पुढील तीन दिवस कोसळधार : ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला इशारा

राज्यात पुढील तीन दिवस कोसळधार : 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला इशारा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us