उपक्रमासाठी रा.स्व.सं.संचलित निरामय सेवा संस्थेच्या वतीने 10 पीपीई किट उपलब्ध
रावेर, (प्रतिनिधी) – कोरोनारूपी जागतिक संकटाला रोखण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर व श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे . ग्रामीण भागातील गावात जाऊन डॉक्टर विनामूल्य वैद्यकीय सेवा देत आहे.सोबत अभाविप कार्यकर्ते कोविड -19 बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे.वैद्यकीय सेवा देऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर ग्रामस्थाना देत आहे. अभाविप व श्रीराम फाउंडेशन रावेर वतीने मोफत मास्क व सेनिटायझर वाटप करून मास्क वापरण्याचा संदेश देत आहेत. सामाजिक अंतर पाळणे , स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन शासनाच्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व श्रीराम फाउंडेशन रावेरच्या वतीने ग्रामीण भागात करण्यात येत आहे .डॉक्टर आपल्या दारी या सामाजिक उपक्रमातुन ग्रामीण भागातील गरजुना अभाविप व श्रीराम फाउंडेशन यांच्या मार्फत आरोग्यसेवा देण्यात येत आहे.
डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात रावेर तहसील कार्यालय , पोलिस स्टेशन येथे सैनिटाझर व मास्क वाटप करण्यात आले .फीवर मशीन द्वारे शरीराचे तापमान घेत कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली.डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचे उद्धाटन रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे ,श्रीराम फाउंडेशन संचालक संतोष महाजन ,वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ महाजन,डॉ रोशन पाटील, पद्माकर महाजन , अभिजीत लोणारी ,प्रा.युवराज माळी ,राहुल पाटील , अभियान प्रमुख यश सोनार ,मयुर सोनवणे ,जयेश पाटील , अनिकेत सोनवणे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करून करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा अभाव दिसून येत आहे. डॉक्टर दारी उपक्रमातुन जनजागृती करून गरजुना मास्क , सैनीटायझर वाटप करून वैद्यकीय सेवा देण्यासाठी अभाविप व श्रीराम फाउंडेशन प्रयत्नशील आहेत.