Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत मुख्यमंत्र्यांची घोषणा

najarkaid by najarkaid
June 5, 2020
in राज्य
0
विधानपरिषद निवडणूक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

अलिबाग,जि.रायगड, दि.05  : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
तत्पूर्वी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे मुंबईहुन बोटीने मांडवा येथे आगमन झाले. त्यानंतर  त्यांनी थळ येथे भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा,  जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, निसर्ग दिवसेंदिवस आपले रंग दाखवीत असताना यंत्रणेनेही आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी उत्तम नियोजन ही काळाची गरज आहे. रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी या संकटाचा निश्चितच उत्तम मुकाबला केला. त्यामुळे कमीतकमी जीवितहानी झाली, त्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन करताना ते पुढे म्हणाले की, पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र नुकसान झालेल्या लोकांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत, व्हिडिओ काढून ठेवावेत. पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे आधी आपले घर आवरुन घ्यावे. नुकसानीचे काढलेले फोटो व व्हिडीओ पंचनामाच्या कार्यवाहीत ग्राह्य धरण्यात येतील. सर्वात आधी घर व परिसराची साफसफाई करून घ्यावी लागणार आहे. जेणेकरून पावसाच्या या दिवसात अस्वच्छतेमुळे परिसरात साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होणार नाही.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, सर्वात जास्त नुकसान विजेच्या खाबांचे  झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यासाठी शासन स्तरावरून मदत निश्चित केली जाईल. याबरोबरच ज्या नागरिकांचा  या वादळामुळे अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासन त्यांच्या अन्नधान्याचा,  जेवणाचा प्रश्न निश्चितच सोडविणार. जनतेच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे आहे.
यावेळी अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे, वय वर्ष 58 ही व्यक्ती चक्रीवादळामुळे विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हा‍धिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,   विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पर्यावरण विभागाचे नाव “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग”प्रास्तावित

Next Post

पर्यावरण दिनानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांचा ‘नागरी वनांचा’ निर्धार

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
पर्यावरण दिनानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांचा ‘नागरी वनांचा’ निर्धार

पर्यावरण दिनानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांचा ‘नागरी वनांचा’ निर्धार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us