जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या उर्दू साहित्य अकादमी च्या माध्यमाने 2017 या सालाचे विशेष पुरस्कार जळगाव जिल्हा मानियार बिरदारीचे अध्यक्ष तथा जैन स्पोर्ट्स अकादमी चे क्रीडा समन्वयक फारूक शेख यांनी मिळाल्याबद्दल कांताई सभागृहात भाजपच्या प्राध्यापक डॉक्टर अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विविध संघटना व सामाजिक संघटनांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
2015,16 व17 असे लगातार तीन वर्ष राज्य शासनाचा पुरस्कार पटकावणारे महाराष्ट्र राज्यातील फारुक शेख हे एकमेव क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असावेत असे मत प्राध्यापक डॉक्टर अस्मिता पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केल्या. व शेख यांचा गौरव केला.
यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष तथा जैन स्पोर्टस अकडमी चे क्रिडा समन्वयक फारुक शेख’ शिवछत्रपती पुरस्कार आयशा खान.,एकलव्य क्रीडा पुरस्कार कांचन चौधरी, क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष एसटी खैरनार , ग्राहक समितीचे अध्यक्ष विजय मोहरील,विफा चे खजिनदार मो आबिद, सह जाणीव बहू उद्देशीय संघटनेच्या मनीषा बागुल, जिल्हा महिला सल्लागार समिती निवेदिता ताठे , साहस फाउंडेशनच्या सरिता माळी, छावा च्या वंदना पाटील, राष्ट्रवादीच्या ममता तडवी, ओबीसी संघटना महाराष्ट्राच्या सचिव मनिषा पाटील, जलतरण संघटनेच्या अध्यक्षा रेवती नगरकर ,पॅरा ऑलिंपिकच्या खजिनदार प्रभावती चौधरी, बँक ऑफ बरोडा च्या विनया जोशी, हॉकी संघटनेच्या सुरेखा रडे, जलतरण संघटनेचे कमलेश नगरकर, ओक, राजेंद्र नेवे बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे टेबल टेनिस चे विवेक अडवणी व शैलेश जाधव बास्केट बॉल चे रवींद्र धर्माधिकारी व वाल्मीक पाटील , तायकवानडो चेअजित घारगे व नरेंद्र चव्हाण ,फुटबॉल असोसिएशनचे इम्तियाझ शेख,शेख ताहीर , स्केटिंग चे संजय पाटील, हॉकीचे लियाकत अली सय्यद , सत्यनारायण व हजार खान, बॅडमिंटनचे बादशाह सय्यद व वैशाली दिक्षित, बेंडाळे कॉलेज ज्युनिअरच्या प्राध्यापिका हिमाली बोरोले,कॅरम चे सय्यद मोहसीन,काद्रिया फाऊंडेशनचे फारुख काद्री,इरफान शेख, सैफोद्दीन शेख व समीर शेख तसेच हॉकी फुटबॉल च्या खेळाडू मुलींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .
सर्वप्रथम बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व सत्कारार्थी फारुक शेख यांचा थोडक्यात पुरस्काराचा आढावा सादर केला .साहस फाउंडेशन च्या सरिता माळी यांनी शेख यांच्या जीवनावर आधारित प्रत्यक्ष घटना विशद केल्या, स्केटिंग चे संजय पाटील यांनी आपले मनोगतात शेख यांच्या कार्यशैली चे कौतुक केले, मो आबिद यांनी त्यांच्या वैवाहिक वाद,सामूहिक विवाह बाबत माहिती दिली.
सत्काराला उत्तर देतांना शेख यांनी चांगले व सत्कार्य करा,एकमेकास सहकार्य करा,ईश्वर तुमचे व तुमच्या कुटुंबियांचे जीवन सुखी ठेवतो त्याचा प्रत्युत्तर मला आला व येत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अनिता कोल्हे व आभार विवेक आळवणी यांनी मानले.