जामनेर, (विशेष प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.या निकालात चि.निखिल राजू पाटील यांची नायब तहसीलदार या राजपत्रित अधिकारी या पदावर निवड झाली आहे. क्रीडा प्रवर्गातून राज्यात प्रथम तसेच संपूर्ण निकालातील सर्वात कमी वयाचा तरुण अधिकारी ठरला आहे.
निखिल हा रायफल शुटींग मध्ये राष्ट्रीय खेळाडू असून त्याला रायफल शुटींगमध्ये अनेक बक्षिसे मिळाली आहेत .एम .काॕम.उत्तीर्ण निखिलचे वडील राजेंद्र एकनाथ पाटील गहूखेडे येथील मूळ रहिवासी असून जळगाव येथील एस.टी.वर्कशाॕप मध्ये हेड मेकॕनिक आहेत .तर आई सौ.भारती पाटील या गृहिणी आहे.निखिलचा मोठा भाऊ पुण्यात नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहे.
गहूखेडे गावातील ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असून सामाजिक कार्यकर्ते कै.एकनाथ गोमाजी पाटील यांचा निखिल हा नातू होय.
निखिल पाटील याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
चिकाटीबाज निखिल
आंतरराष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटर निखिल खूपच चिकाटीबाज आहे.शुटींगसाठी त्याला रायफल आम्ही इटलीहून आणून दिली आहे.राज्यात प्रथम वर्ग अधिकारी होण्याचा त्याने ध्यास घेतला आहे.
-राजेंद्र पाटील (निखिलचे वडील )
माझे यश दोन्ही आजोबांना समर्पित !
माझ्या यशाला पाहण्यासाठी आज माझ्या आईचे वडील कै.जिजाबराव नानू पाटील निंभोरा स्टेशन आणि वडिलांचे वडील कै.एकनाथ गोमाजी पाटील गहूखेडे ता.रावेर हे दोघेही हयात नाहीत .एक महिन्याच्या अंतराने महिन्यापूर्वीच दुर्दैवाने दोघांना देवाज्ञा झाली.माझे यश पाहायला दोन्ही आजोबा हवे होते.मी माझे यश माझ्या दोघे आजोबांना समर्पित करतो.
–निखिल पाटील














