Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

मागील वर्षेभरात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त ; 1351 गुन्ह्यांची नोंद, 553 आरोपींना अटक

najarkaid by najarkaid
January 14, 2021
in जळगाव
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने मागील वर्षेभरात जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत अवैध मद्य विक्री विरोधात राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत एक कोटी अठ्याण्णव लाख एकोणतीस हजार एकतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती सीमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत एकूण 1351 गुन्हे नोंदविलेले असुन यामध्ये वारस-539, बेवारस-812 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 553 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोहाफुले-100 किलो, हातभट्टी दारु 18173 लि, देशी मद्य- 1103.09 ब.लि., विदेशी मद्य-1807.3 ब.लि., बीअर 109.29 ब.लि. तसेच बनावट देशी मद्य-423.36 ब.लि. बनावट विदेशी मद्य-25.9 ब.लि., परराज्यातील मद्य-9.75 ब.लि., बनावट ताडी 561 लिटरचा समावेश आहे. यात 55 दुचाकी व 6 चारचाकी वाहनांचाही समावेश असून वर्षेभरात 1 कोटी 98 लाख 29 हजार 31 इतक्या रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
*ग्रामपंचायत निवडणूक काळात 34 गुन्ह्यांची नोंद तर 19 आरोपींना अटक*
त्याचबरोबर जिल्ह्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही विभागाने 1 ते 13 जानेवारी, 2021 या 13 दिवसांमध्ये एकूण 34 गुन्हे नोंदविले असुन यात वारस-14, बेवारस-20 गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये एकूण 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हातभट्टी दारु-511 लि, देशी मद्य- 7.74 ब.लि., बीअर 1.95 ब.लि., तसेच बनावट विदेशी मद्याच्या एम्पेरीयल ब्यु व्हीस्कीच्या 180 मि.ली. च्या 500 सिलबंद बाटल्या, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या, 3 दुचाकी वाहने, 1 (टाटा सुमो) चारचाकी वाहन असा एकुण 15 लाख 74 हजार 627 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाय या कालावधीत वरील गुन्ह्यांपैकी एकुण 3 गुन्हात्म गुन्हे नोंदविण्यात आले असुन यामध्ये तीन बनावट दारुचे कारखाने उध्दवस्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्याकरीता लागणारे साहित्य स्पीरीट, 3 बॉटलींग मशिन, हायड्रोमिटर, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या व तसेच मद्यार्क-350ब. लि., बनावट देशी/ विदेशी मद्य 850 ब.लि, एक दुचाकी वाहन व तीन चार चाकीवाहने असा एकुण 20 लाख 61 हजार 991 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात हातभट्टी व अवैध मळी/मद्य/मद्यार्क याची निर्मिती, विक्री, वाहतुक, आयात, निर्यात, खरेदी व बाळगणे महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा असुन किमान 3 ते 5 वर्ष कारावास किंवा 25 ते 50 हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही इतक्या शिक्षेची तरतुद आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायीची माहिती देणा-या इसमांचे नाव गोपनीय ठेवण्यात येते व शासनाने विहित केल्यानुसार खबरीस भरीव बक्षीस देण्यात येईल. याकरीता विभागाने संपर्क क्रमांक, विभागाचा व्हॉटसॲप क्रमांक, टोल फ्री क्रमांक ई-मेल आयडी इत्यादी माहिती असलेले जाहिर सुचनेचे फलक जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये लावले असून सीमावर्ती भागातील छोट्या गावांमधून राज्यात येणारे रस्ते किंवा खुशकीच्या मार्गावरुन महाराष्ट्र राज्यात परराज्यातील अवैध मळी / मद्यार्क / मद्याची वाहतुकीस आळा बसविणे कामी व अशा अवैध धंद्याची माहिती मिळविण्यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करुन सहभाग वाढवण्याकरीता त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सीमा तपासणी नाके, गांवामधून राज्यात येणारे रस्ते व खुशकीच्या मार्गावर जाहीर सुचनाचे फलकही लावण्यात आल्याचे श्रीमती झावरे यांनी कळविले आहे.
*ग्रामपंचायत निवडणूकीत अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती*
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेश व सुचनांप्रमाणे तसेच कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्रीमती उषा वर्मा, संचालक, (अंमलबाजवणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री. अर्जुन ओहोळ, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार जळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगांव कार्यालयाकडुन अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी जिल्ह्यात एक विशेष भरारी पथक व इतर पाच पथके यांचेकडुन अवैध मद्य विक्री विरुध्द कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही श्रीमती झावरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे सहा निर्णय…

Next Post

बालगृहातील बालकांच्या परिपोषणासाठी असलेल्या 2 हजार रुपयांच्या अनुदानामध्ये होणार एवढी वाढ

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
बालगृहातील बालकांच्या परिपोषणासाठी असलेल्या 2 हजार रुपयांच्या अनुदानामध्ये होणार एवढी वाढ

बालगृहातील बालकांच्या परिपोषणासाठी असलेल्या 2 हजार रुपयांच्या अनुदानामध्ये होणार एवढी वाढ

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us