Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर

आजपासून आचारसंहिता लागू ; जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचातींचा समावेश

najarkaid by najarkaid
December 11, 2020
in राज्य
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. ११ : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

श्री. मदान यांनी सांगितले, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नामनिर्देशनपत्रे ३० डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, अशी माहिती श्री.मदान यांनी दिली.

२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोनदिवसीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येंनी ऑनलाईन नोंदणी करावी,

Next Post

अटल भुजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील 63 गावांचा समावेश झाल्याने परिसरातील सिंचन पातळी वाढणार – खा. उन्मेश पाटील

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
अटल भुजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील 63 गावांचा समावेश झाल्याने परिसरातील सिंचन पातळी वाढणार – खा. उन्मेश  पाटील

अटल भुजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील 63 गावांचा समावेश झाल्याने परिसरातील सिंचन पातळी वाढणार - खा. उन्मेश पाटील

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us