Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील शाळांना ‘या’ तारखेपासून उन्हाळी सुट्टी ; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

najarkaid by najarkaid
April 11, 2022
in शैक्षणिक
0
राज्यातील शाळांना ‘या’ तारखेपासून उन्हाळी सुट्टी ; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. ११- संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार दि. १३ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे.या निर्णयानुसार सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

इयत्ता पहिली ते नववी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि तो निकाल विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहिल.शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या परवानगीने घेता येईल. तथापि, माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील, असेही या परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट ; राज्यावर भारनियमनाचे सावट

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ११ एप्रिलच्या महत्वाच्या बातम्या जाणून घ्या…

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षेची तारीख वेळ जाहीर

जळगाव जिल्ह्यातील ११ एप्रिलच्या महत्वाच्या बातम्या जाणून घ्या...

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us