मुबंई, – गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य यादीवर आज दुपारी 1वाजता होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्का मोर्तब होऊ शकतो.महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील सदस्यांची यादी बैठकीनंतर राज्यपाल यांच्या कडे पाठवू शकतात.
भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव विधानपरिषदच्या राज्यपाल नियुक्त राष्ट्रवादी कोट्यातून फायनल होणार असल्याच खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाकडून मात्र अद्याप कुणाचंही नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. आज दुपारी 1वाजता होत असलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.