Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रस्ता करा अन्यथा मतदानावर बहिष्कार; परभणी जिल्ह्यातील 10 गावांचा निर्णय

najarkaid by najarkaid
September 29, 2019
in राज्य, राजकारण
0
रस्ता करा अन्यथा मतदानावर बहिष्कार; परभणी जिल्ह्यातील 10 गावांचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

परभणी – गोदाकाठच्या रस्ता दुरुस्तीसाठी सोनपेठ तालुक्यातील सात गावांनी घेतलेल्या महापंचायतीत मतदानावर बहिष्कार व नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. रस्त्याच्याच प्रश्नावर जिंतूर तालुक्यातील घुसकवडी या गावानेही बहिष्काराचा इशारा दिला आहे. तर परभणी तालुक्यातील दोन गावांनी स्वतंत्र मतदान केंद्राच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. एकूण 10 गावांनी आपल्या-सोयीसुविधांसाठी दिलेल्या या इशार्‍याने निवडणूक विभागाला या ग्रामस्थांची मनधरणी करावी लागणार आहे.
सोनपेठ तालुक्यातील गोदावरीकाठच्या अकरा गावांचा रस्त्यांचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. थोडा पाऊस पडला की सात गावांचा जगाशी असणारा संपर्क तुटतो. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतात. नुकत्याच झालेल्या पावसाने गोदाकाठच्या गावांना जोडणारे दोन्हीही रस्ते ठप्प झाल्याने या गावातील विद्यार्थ्यांची शाळा आठ दिवस बंद होती. या गावात झालेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांना जाता आले नाही. गरोदर स्त्रिया व रुग्णांचे मोठे हाल झाले. यामुळे त्रस्त झालेल्या गोदाकाठच्या नागरिकांनी गुरुवारी थडी उक्कडगाव येथे सात गावांतील नागरिकांची महापंचयात आयोजित केली होती.
या महापंचायतीत गोदाकाठच्या गावांनी निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकून मतदान न करण्याचे ठरवले आहे. तसेच शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकार्‍यांना गावबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याबाबत सोमवारी सोनपेठ येथे प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरले आहे. प्रत्येक गावात गावबंदीचा व निवडणूक बहिष्कार बाबत फलक लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
दोन गावांची मतदान केंद्रांची मागणी- परभणी तालुक्यातील मोहापुरी व गव्हा या दोन गावांनी स्वतंत्र मतदार केंद्र न दिल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या दोन गावामध्ये 500 मतदार असून गावांना 8 किमी आंतरावर असलेल्या पान्हेरा या गावातील मतदान केंद्राशी जोडलेेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी या दोन्ही गावांना स्वतंत्र मतदान केंद्र आहे. परंतु लोकसभा व विधानसभेला हे गाव 8 किमी वरील पान्हेराशी जोडलेले आहे. परिणामी मतदानाची टक्केवारी 50 टक्केपेक्षाही खाली येते. या पार्श्वभुमीवर या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष शांती स्वरूप जाधव, शहर जिल्हाध्यक्ष किरण तळेकर यांनी केली आहे.

भुसकवडीचाही रस्त्याचा प्रश्न- जिंतूर तालुक्यातील भुसकवडी ग्रामस्थांनी रस्त्याच्याच दुरावस्थेवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या गावाला रस्ताच नाही. कच्चा रस्त्यावरूनच दळणवळण करावे लागते. प्रत्येक निवडणुकीला आश्वासन दिले जाते. आमदारांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. मागील सात ते आठ निवडणुकांपासून प्रशासनाकडेही रस्त्याची मागणी करूनही या प्रश्नाकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचे नऊ संकल्प

Next Post

सक्षम हृदयासाठी तणावमुक्त राहा’

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
सक्षम हृदयासाठी तणावमुक्त राहा’

सक्षम हृदयासाठी तणावमुक्त राहा’

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us