जळगांव, (प्रतिनिधी) – रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स तर्फे आपल्या ग्राहकांना गर्दीमुळे वाढणाऱ्या कोरोना संकटापासून दूर राहून सोने खरेदी करता यावी यासाठी खास दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील रिंग रोडवर स्थित श्री महेश प्रगती हॉल व काव्यरत्नावली चौकातील मिटींग पॉईंट हॉल येथे विक्री स्टॉल्स सुरू करण्यात येणार आहेत.
हे स्टॉल्स फक्त एक दिवसासाठी स.१०.३० ते सा.७ पर्यंत सुरू राहतील तसेच येथे ग्राहकांना शुद्ध सोन्याचे शिक्के, तुकडे, आपट्याची पाने खरेदी करता येणार आहे. दागिने बुकिंग, प्रशस्त पार्किंग इ. सुविधांचा लाभ देखील मिळणार आहे. या विक्री स्टॉल वर दागिने उपलब्ध नाहीत.यासोबतच रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सचे सुभाष चौक आणि भवानी पेठ येथील प्रतिष्ठान सकाळी 9 पासून सुरु राहणार आहेत ग्राहकांनी आपल्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही ठिकाणी भेट देऊन सोने खरेदी करावे असे आवाहन रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्यातर्फे करण्यात आले आहे.