Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यु.पी.एस.सीः‘कठीण’ आहे पण ‘अशक्य’ नाही ; जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार आश्विन राठोड यांच्यासोबत संवाद

najarkaid by najarkaid
September 29, 2021
in Uncategorized
0
यु.पी.एस.सीः‘कठीण’ आहे पण ‘अशक्य’ नाही ; जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार आश्विन राठोड यांच्यासोबत संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

प्रश्न : आपण आय.ए.एस. व्हावे असा विचार मनात कधी विचार आला व त्याकरीता सुरुवातीपासुन काय नियोजन केले?

उत्तर : शालेय शिक्षण घेत असतांना मी आय.पी.एस. होण्याचे स्वप्न बाळगून होतो. पुढे बी.एस.सी करत असतांना व युपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करताना आय.ए.एस. होण्याचे मनापासून ठरविले. बी.एस.सी. अभ्यासासोबतच यु.पी.एस.सी परीक्षेची पुर्वतयारी सुरु केली. यासाठी बेसीक अभ्यास, भरपूर वाचन व सरावावर भर दिला.

प्रश्न : यु.पी.एस.सी. परीक्षेकरीता कशाप्रकारे पूर्व तयारी केली?

उत्तर : यु.पी.एस.सी.करीता स्वत:मध्ये विश्वास असणे आवश्यक आहे. विषयाच्या अवास्तव वाचनापेक्षा मुलभूत अभ्यासक्रम व माध्यमावर भर देवून जास्तीत जास्त सराव केला.

प्रश्न : आपण कोणत्या शाखेतून शैक्षणिक अर्हता पूर्ण केली. या अभ्यासक्रमाचा यु.पी.एस.सी. परीक्षेकरीता

किती व कसा फायदा झाला?

उत्तर : शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेत वनस्पतीशास्त्र (बॉटनी) व प्राणीशास्त्र(झूलॉजी) विषय घेतले.त्याच विद्याशाखेत बीएससी ही पदवी पूर्ण केली. त्याचा फायदा मला प्रत्यक्ष परीक्षेची तयार करतांना झाला.

प्रश्न : यु.पी.एस.सी. मुख्य परीक्षेसाठी कोणकोणते विषय घेतले व ते घेण्यामागचा उद्देश काय होता?

उत्तर : यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी मुख्य विषय वनस्पतीशास्त्र व पर्यायी विषय प्राणीशास्त्र हा होता. हेच माझ्या पदवीचे विषय असल्याने ते आवडीचे विषयही होते. त्याचा अभ्यास करणे माझ्यासाठी सोईचे होते, म्हणून या विषयांची निवड केली.

प्रश्न :युपीएससी परीक्षेकरीता कोणाचे मार्गदर्शन घेतले? परीक्षेची तयारी कुठे व कशी केली?

उत्तर : यु.पी.एस.सी. परीक्षेची तयारी मी दिल्ली येथे केली. या परीक्षेकरीता माझे शिक्षक, युपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच माझे सिनीयर, तसेच माझे मित्रमंडळी व आई-वडीलांचा खूप मोठा वाटा आहे. या परीक्षेसाठी मी जास्तीत जास्त भर सरावावर दिला.

प्रश्न :तुम्ही अकोला जिल्ह्याचे आहात; आपल्या जिल्ह्यात युपीएससी परीक्षा देण्यासाठी कितपत पोषक वातावरण आहे?

उत्तर : माझे शालेय शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. जिल्ह्यात यु.पी.एस.सी. पूर्वतयारी करीता आवश्यक पोषक

वातावरण नाही. परंतु कठीण परिश्रम व प्रयत्नाने यु.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा देवू शकता. या परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी शासनही अनेक उपक्रम राबवित आहे. तसेच ऑनलाईन, युट्युब सारख्या माध्यमाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन परीक्षार्थी आपला अभ्यास करु शकता.

प्रश्न : यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?

उत्तर : यु.पी.एस.सी. परीक्षा ही कठीण परीक्षा आहे परंतु अशक्य नाही. परीक्षेची पूर्वतयारी करताना कठीण परिश्रमांसोबत ‘स्मार्ट वर्क’ आवश्यक आहे. यु.पी.एस.सी. ची तयारी करताना आत्मविश्वास, सातत्य, सराव अभ्यासक्रमावर भर द्यायला हवा. तसेच आपल्याकडे अभ्यासाचे जे मुळ स्त्रोत( शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके, एनसीईआरटीची पुस्तके इ.) आहेत, त्यांचाही वापर अधिकाधिक करायला हवा. सराव जास्तीत जास्त करा, कमी पण चांगले मित्र बनवा व ज्या व्यक्तीसोबत आहात तो तुम्हाला सकारात्मक विचाराचा व प्रोत्साहित करणार असावा. सर्वात महत्वाचे परीक्षेची तयारी करताना स्वत:वर विश्वास ठेवून यु.पी.एस.सी. हेच आपले ध्येय असावे.

-शब्दांकनः सतिश बगमारे, माहिती सहायक, जिमाका, अकोला.

000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारने पेन्शनचे नियम बदलले! आता मिळेल इतके मासिक पेन्शन, जाणून घ्या नवीन नियम

Next Post

स्व.कर्मवीर तात्यासाहेब ह.रा.पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
स्व.कर्मवीर तात्यासाहेब ह.रा.पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता

स्व.कर्मवीर तात्यासाहेब ह.रा.पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us