यावल – यावल तालुका वकील संघ कार्यकारिणीची नुकतीच सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. त्यात अध्यक्षपदी अॅड.विनोद एम.परतणे, तर सचिवपदी अॅड.धीरज व्ही.चौधरी आणि ग्रंथपाल म्हणून अॅड.नीलेश पी.मोरे यांना संधी देण्यात आली.
यावल तालुका वकील संघ कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्याची परंपरा यंदा देखील कायम राहील. यंदाच्या कार्यकारिणी निवडीसाठी झालेल्या सभेला माजी अध्यक्ष अॅड निवृत्ती पाटील, सचिव अॅड.क़िशोर सोनवणे यांच्यासह सभासद अनुक्रमे अॅड.एस.जी.कवडीवाले, राजेश गडे, एस.आर. लोंढे, के.डी.पाटील, नितीन चौधरी, अशोक सुरळकर, गोविंद बारी, मोहित शेख, खालिद शेख, एस.एस.कुलकर्णी, उमेश बडगुजर, देवेंद्र बाविस्कर, गौरव पाटील, दत्तात्रय सावकारे आदींची उपस्थिती होती.














