जळगाव – अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविदयालयातील गणित विषयाचे प्राध्यापक मुळे ज्ञानेश्वर विठ्ठलराव यांना कवयिञी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या वतिने नुकतीच गणित या विषयामध्ये पीएच. डी पदवी प्रदान केली आहे.
त्यांना धुळे येथील विशाल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रा.ए. बी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी. आर. अहिरराव यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली त्यांनी “A study of quadratic differential and Integral Equations” या विषयावर त्यांनी शोधनिबंध विद्यापीठास सादर केला होता. या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.














