Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे गुन्हा आहे का?- रोहिणी खडसे

najarkaid by najarkaid
November 18, 2024
in Uncategorized
0
मुक्ताईनगर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे गुन्हा आहे का?- रोहिणी खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे , शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे गुन्हा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत जर हा गुन्हा असेल तर मला या गुन्ह्यात अटक झाल्याचा मला अभिमान असुन या गुन्ह्यात अटक व्हायला मी शंभर वेळा तयार असल्याचे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी बोदवड येथिल जाहीर सभेत केले
मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ बोदवड येथिल गांधी चौकात माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, विशाल खोले महाराज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ॲड रोहिणी खडसे म्हणाल्य बोदवड तालुक्याने कायम शरद पवार साहेबांवर निष्ठेने प्रेम केलेले आहे ते प्रेम कायम ठेवा अशी विनंती करायला मी आले आहे
राज्यातील शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेच्या विरोधी असणारे महायुती सरकार बदलवून महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब राज्यभर प्रचार सभा घेत आहेत म्हणून आपले एक एक मत महत्वाचे असल्याचे सांगुन आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान रूपी आशीर्वाद देण्याची त्यांनी विनंती केली
पुढे बोलताना त्या म्हणाल्या
विद्यमान आमदारांनी मागील निवडणुकीत आश्र्वासने दिलीत परंतु निवडून आल्यावर एकही आश्र्वासन त्यांनी पाळले नाही
मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी तरुणांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला नाही
आम्ही गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला निवेदने दिली, आंदोलने केली परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत
आज मतदारसंघातील काही गावांमध्ये आमच्या बदनामी साठी पत्रक वाटण्यात आले आहेत त्यामध्ये वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीच्या कात्रणाची “रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात” एवढी हेडलाईन फक्त छापण्यात आली आहे परंतु पत्रक छापणाऱ्यांनी ती पुर्ण बातमी छापायला हवी होती
ती बातमी जुन 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा जळगांव दौऱ्यावर आले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या कांदा,कापुस, केळी पिकाला योग्य भाव मिळावा , पिक विमा मिळावा, विज बिल माफ व्हावे अशा मागण्या करण्यात आल्या होत्या त्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात मुख्यमंत्री महोदयांना काळे झेंडे दाखवण्याचे आंदोलन करण्यात आल्यामुळे मला आणि इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती ही त्यासंबंधीच्या बातमीची हेडलाईन आहे
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्या मुळे मला अटक झाली त्याचा मला अभिमान आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे चुकीचे आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले म्हणजे गुन्हा केला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मला अटक होत असेल तर मी शंभर वेळा अटक व्हायला तयार आहे
अटक झाली तरी मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहिल असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी केले
पंधरा दिवसांपूर्वी प्रचारासाठी आम्ही बोदवड तालुक्यात आलेलो असताना शेतकरी बांधवांनी शेतीच्या बांधावर येऊन लाल्या रोगामुळे कपाशीचे झालेले नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केली होती त्यावेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघुन मन विषण्ण झाले होते शेतातून निघून तहसिल कार्यालयात गाठून निवडणूक आचार संहिता बाजुला ठेवून शेतकऱ्यांचे लाल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते
त्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली हे शेतकऱ्यांना आर्थिक प्रलोभन दाखवण्या सारखे आहे म्हणून निवडणूक आयोगाने रोहिणी खडसे यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे
शेतकऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे त्यांचे प्रश्न मांडणे गैर आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे या मतदारसंघात गुन्हा आहे का?
तुम्हाला लोकांनी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निवडून दिले तरी तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत आम्ही ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो तर आम्हाला याप्रकारे त्रास देणे योग्य आहे का असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला
विरोधक तिस वर्षात काय केले असे विचारताच तिस वर्षात काय केलें हे सर्वांच्या समोर आहे
परंतु विरोधक पाच वर्षात काय केले मुख्यमंत्र्यानी सांगितलेला पाच हजार कोटी रुपये निधी कुठे गेला या प्रश्नाला बगल देतात
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महीला, तरुण, शेतकरी, सर्व सामान्यांसाठी विकासाची पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायला आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती रोहिणी खडसे यांनी केली
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषद वर आमदारकीची संधी देण्याचा शब्द पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेला आहे म्हणून आपले मत महत्वाचे असुन आपल्याला एका मताद्वारे दोन आमदार मिळणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले

यावेळी विशाल महाराज खोले यांनी शेतकरी कष्टकरी महिला युवकांच्या हिताचे निर्णय घेणारे महाविकास आघाडीचे सरकार येणे खुप महत्वाचे असुन
त्यासाठी सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले

यावेळी ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांनी बोदवड तालुका नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबां सोबत राहिला असुन या निवडणुकीत सुद्धा राहील रोहिणी खडसे यांना या तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त करून गेले पाच वर्ष सतत मतदारसंघात सर्व सामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशिल , सक्रिय असणाऱ्या सुसंस्कृत, उच्च शिक्षित रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले .
यावेळी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघात गेल्या पाच वर्षात विकासाचा बट्ट्याबोळ झालेला असुन भ्रष्टाचार , गुंडगिरी वाढली आहे हे सर्व रोखण्यासाठी
मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी शेतकरी कष्टकरी महिला युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी जनहिताची तळमळ असणाऱ्या ॲड रोहिणी खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले
यावेळी डॉ सुधिर पाटिल, दिपक झांबड, ॲड मनोहर खैरनार, डॉ जगदिश पाटिल यांनी मनोगत व्यक्त करून रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या निवडणुकीतून मुक्ताईनगर मतदारसंघाला रविंद्र भैय्यांच्या रूपाने दोन आमदार मिळणार – रोहिणी खडसे

Next Post

गोदावरी नर्सिंगच्या प्रा. अश्वीनी वैद्यांचे यश

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
गोदावरी नर्सिंगच्या प्रा. अश्वीनी वैद्यांचे यश

गोदावरी नर्सिंगच्या प्रा. अश्वीनी वैद्यांचे यश

ताज्या बातम्या

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us