जळगाव/जामनेर, (विशेष प्रतिनिधी) – भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोरोना विरोधातल्या लढाईत खारीचा वाटा उचलला आहे. पंतप्रधान केअर फंडात त्यांनी आपला मदतनिधी जमा केला आहे. “माझा देश हीच माझी ओळख” असं म्हणत त्यांनी आपण मदतनिधी दिल्याचं फेसबुक व ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
तसेच इतरही भाजप नेत्यांना त्यांनी पीएम केअर फंडात मदत करावी म्हणून आवाहन केलं आहे.