जळगाव – ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंघाने दि. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय, जळगाव येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी जळगाव (ग्रामीण भाग) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.















