Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर समाजाला पुढे नेण्याची गरज – ॲड. भाग्यश्री महाजन

najarkaid by najarkaid
March 9, 2022
in जळगाव
0
महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर समाजाला पुढे नेण्याची गरज – ॲड. भाग्यश्री महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- पुर्वीपेक्षा आज महिला सबलीकरणासाठी समाजाकडून व कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात दिसून येते. अगदी बस चालकापासून तर भारताचे सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी आपापल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. पण तरीदेखील मला असे वाटते की, आज महिला जरी काही प्रमाणात ‘सबला’ झाली असली तरी महिलांनीच स्वतःच्या कर्तृत्वावर समाजाला पुढे नेण्याची गरज आहे. कारण महिला दोन कुळांचा सांभाळ करून सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य करते असे प्रतिपादन केले

पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त पाचोऱ्या शहरातील ख्यातनाम विधीतज्ञ व सामाजिक क्षेत्रात महिला सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या ॲड. भाग्यश्री महाजन यांचे ‘महिला सुरक्षा व महिला सबलीकरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला सुरक्षा व महिला सबलीकरण’या विषयावर रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पाचोऱ्या तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पाचोरा नगरपरिषदेच्या नगरसेविका  सौ. सुचेता वाघ व सौ. ज्योती वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या  गं. भा. सखुबाई तडवी, कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये समाजाला आरोग्य सेवा देणाऱ्या  श्रीमती ज्योत्स्ना पाटील, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या आणि गोरगरीब जनतेला मेसची सेवा देणाऱ्या  श्रीमती मंगला कुलकर्णी व मा. सौ. संगीता कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी  सौ. ज्योती वाघ विद्यार्थिनींना उद्देशून म्हणाल्या की, या समाजाच्या उत्थानासाठी विशेष कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा तुमच्यासारख्या विद्यार्थिनींना आदर्श ठरणार आहे. तुम्हाला भविष्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय किंवा कोणत्याही क्षेत्रात कार्य करण्यासाठी आमची सदैव मदत राहीलच असा विश्वास दिला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रो. डॉ. वासुदेव वले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनींना विविध क्षेत्रात भरारी घेण्यासाठी महाविद्यालय हे एक व्यासपीठ आहे. त्याचा आपल्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्या असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. इंदिरा लोखंडे आणि प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. मेघा गायकवाड व प्रा. प्राजक्ता शितोळे यांनी केला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, ताईसाहेब सौ. किर्तीताई अहिरे, प्रा. एस. आर. ठाकरे, डॉ. सुनिता गुंजाळ, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. सुनील पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश देशमुख, प्रा. श्वेता देव व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्रांती सोनवणे तर आभार प्रदर्शन प्रा. सुवर्णा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. मच्छिंद्र पाटील, श्री. समाधान पवार, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. जयेश कुमावत यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१५ हजार ४२६ पदांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी शासन विशेष भरती मोहीम राबविणार

Next Post

MPSC ; पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज

MPSC ; पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us