
चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील मच्छी मार्केट मधील मच्छी विक्रेत्यांना चाळीसगाव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मास्क वाटप करण्यात आले.जगभरात कोरोना ने थैमान घातल्यामुळे चाळीसगाव येथील मासे विक्रेत्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष रघुनाथ तुकाराम कोळी यांच्यातर्फे सर्व मच्छी विक्रेत्यांना माक्स वाटप करण्यात आले त्यावेळी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष जिभाऊ कोळी, अनिल कोळी, बबलू शेवरे, यांच्यासह मच्छी विक्रेते बांधव उपस्थित होते.















