चाळीसगाव – उष्णता दिवसेंदिवस वाढत असून या तापमान वाढीला नियंत्रण करण्यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावून ते जागवावे असा संकल्प करावा . याच उद्देशाने धुळे रोड येथील भगवान बापू मित्र मंडळ तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला .
महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून भगवान बापू मित्र मंडळ यानी वृक्षरोपण व परिसर स्वच्छता कार्यक्रम आयोजीत केला . यात बालगोपालांपासुन ते जेष्ठ नागरिक यानी सहभाग घेतला. यात सुरेश वाणी, यांचे हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. महारू माळी , विशाल व परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.