Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्ताने ‘आज गांधी आठवतांना…!

ज्ञानपीठ गौरवप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे उद्या ऑनलाईन व्याख्यान

najarkaid by najarkaid
September 20, 2021
in जळगाव
0
महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्ताने ‘आज गांधी आठवतांना…!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 20 (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ‘आज गांधी आठवतांना…!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजले आहे. ‘ जोपर्यंत श्रीमंत-गरीबांना आवश्यक एवढे स्वदेशी वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी केवळ पंचा नेसेल या’…राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिज्ञेला २२ सप्टेंबर २०२१ रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या औचित्याने हा विशेष कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.

देशातील गोर-गरीब जनतेला नेसायला पुरेसे वस्त्र ही मिळत नाही व आपण मात्र पूर्ण वस्त्रानिशी वावरतो. याबाबीचे गांधीजींना खूप वैशम्य वाटत असे. त्यांचे संवेदनशील मन व्यथित झाले.‘जोपर्यंत गोर-गरीबांना आवश्यक तेवढे वस्त्र मिळत नाही तोपर्यंत फक्त पंचा नेसेल व इतर वस्त्रांचा त्याग करीन…’ ही प्रतिज्ञा त्यांनी २२ सप्टेंबर १९२१ रोजी मदुराई येथे केली. त्या दिवसापासून गांधीजी आजीवन फक्त पंचा नेसून राहिले. महात्मा गांधीजींच्या अनुयायांनी देखील जास्त वस्त्र संग्रह न करता गरजेपुरते वस्त्र वापरण्याचा संकल्प घेतला. गांधीजींच्या या कृतीची प्रेरणा इतरांना देखील मिळाली व इतरांनी देखील कमीतकमी वस्त्र वापरण्यास सुरूवात केली.

महात्मा गांधींच्या या वस्त्र त्यागाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने व ‘त्याग करण्यात नेहमीच स्वात्विक आनंद प्राप्त होतो’ या गांधीजींच्या वचनाचे स्मरण करुन आपल्यातील वाईट सवयी, व्यसन यांचा त्याग करण्याचा संकल्प करण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. बुधवार २२ सप्टेंबर २०२१ ला दुपारी ४.०० वाजता ऑनलाईन स्वरुपात होणाऱ्या या कार्यक्रमात फेसबुक(https://www.facebook.com/gandhiteerth/) व युट्यूब लिंकद्वारे, (https://www.youtube.com/c/GandhiTeerth) सर्वांना सहभागी होता येईल.

व्याख्यानानंतर या विषयावर प्रश्नोंत्तरे ही होतील. जास्तीत जास्त संख्येने खालील लिंकवर क्लिक करुन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या RD खात्यावरही मिळेल कर्ज ; किती व्याज लागेल? जाणून घ्या

Next Post

‘त्या’ घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
‘त्या’ घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

'त्या' घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us