सभेत एकमताने सर्व विषय मंजूर
यावल – मधुकर कारखान्याची ४५ वि वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १५ सप्टेंबर रोजी कारखाना कार्य स्थळावर सकाळी ११ वाजता कारखाण्याचे चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. सर्वात प्रथम ना. हरिभाऊ जावळे, माजी आ. शिरीष चौधरी यांच्यासह माण्यावरानंचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षाचे प्रोसेडींग वाचून कायम करण्यात आले.
त्यांनतर प्रोसेडींग वरील दुसरा विषयाला सुरुवात होताच २०१८-१९ मधील थकीत उस पेमेंट, थकीत वाहतूक पेमेंट व कामगार पेमेंट मिळण्याबाबत उस उत्पादक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे (कोरपावली), विजय प्रेमचंद पाटील (सावखेडा सीम), गोवर्धन बोरोले (कोडवद), रजनी दामोदर कोळंबे ( सांगवी बु.), पुंडलिक राजाराम पाटील (दहीगाव), एकनाथ चुडामण नेमाडे (सावदा), रघुनाथ रामकृष्ण तळेले (सातोद), या शेतकऱ्यांनी विचारणा केली उस पेमेंट मिले पर्यंत सभेचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यावेळेस प्रचंड गोंधळ सुरु झाला. शेतकरी काहीही एकून घेण्याच्या भूमुकेत न होते.
यावेळेस चेअरमन शरद महाजन यांनी शेतकऱ्यांना शांततेचे वारंवार आव्हान केले व सांगितले की, थकीत उस पेमेंटसाठी शासनाची थक हमी आवश्यक आहे. व त्यासाठी राज्य शासनाकडे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, ना. हरिभाऊ जावळे, माजी आ. शिरीषदादा चौधरी यांच्या मार्फत संचालक मंडळ सातत्याने प्रयत्न करीत आहे. एफ. आर. पी. कायद्यानुसार उस उत्पादकांची थकीत देयके बाकी असल्यामुळे साखर आयुक्त यांनी आर. आर. शी. कार्यवाही जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे मार्फत सुरु आहे. सदर प्रक्रिया चालू आहे. थकहमी मिळताच थकीत उस पेमेंट अदा करण्यात येईल. त्यानंतर उस पेमेंट बाबत ना. हरिभाऊ जावळे, माजी आ. शिरीष चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून स्वयंम ठेवण्याची शेतकऱ्यांना विनंती केली. व आम्ही सर्व मिळून कारखाना सुरु राहण्यासाठी पक्ष विरहित प्रयत्न थक हमीसाठी शासनाकडे करू असे सांगितले.
मध्यानंतरी थकीत उस पेमेंट बाबत गोंधळ वाढण्याने शेतकऱ्यांना उस पेमेंट मिळणे पर्यंत सभा तहकूब ठेवण्याची भूमिका घेतली. त्यावेळेस चेअरमन शरद महाजन यांनी सभा तहकूब केल्याचे सांगितले. त्यानंतर राकेश फेगडे उपसभापती कृ. उ. बा. समीती यावल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या भावनांची नोंद घ्याची तसेच सभासदांनी सभा घेणे हे घटने नुसार महत्वाचे आहे. तसेच शेतकरी व संचालकापुढे सुचवलेकी शासन धोरणा प्रमाणे संचालकांच्या प्रापर्टीज मोर्गेज केल्यास थकहमी मिळु शकते. त्यासाठी त्यांनी पंकजा मुंडे यांचे कारखान्याचे उदाहर्ण दिले. यावर शेतकर्यांनी समर्थन दिले व सांगितले सभा तहकुब न करता पुढील कामकाज सुरळित चालु द्यावे. पण हि अट संचालक मंडळाने मान्य करावी, संचालक मंडळाने अट मान्य केल्याने त्यास अनुमोदन विजय पाटील यांनी दिले. त्याला सभासदांनी होकार दिला व सभा पुन:श्च सुरु झाली. सभेच्या सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
तसेच थकीत उस पेमेंटसाठी शासनाकडे हमीसाठी पाठपुरावा करण्यात यावा व त्यासाठी आवश्क अटीची पूर्तता करण्यात यावी असा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर ना. हरिभाऊ जावळे यांनी सांगितले की, कारखाना परिसराचे वैभव आहे हा प्रकल्प टिकला पाहिजे यासाठी लोकप्रतिनीधी या नात्याने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कारखाना टिकवण्यासाठी हि सर्वांची जबाबदारी आहे. सभासदांना सविस्तर माहिती देवून शंकांचे निरसन केले. तर माजी आ. शिरीष चौधरी यांनी ४५ वर्षात कारखाना सातत्याने चालू आहे. कायदेशीर प्रक्रियेमधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू असे संयम ठेवण्याचे आव्हान केले.
यावेळी व्यासपीठावर ना. हरिभाऊ जावळे, कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, माजी आ. शिरीष चौधरीं, माजी आ. अरुण पाटील, माजी आ. रमेश चौधरी, माजी व्हाईस चेअरमन जिल्हा बँक आर. जी. नाना पाटील, जे टी महाजन तंत्रनिकेतनचे व्हाईस चेअरमन उल्हास चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे, जि. प. माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी जि. प. सदस्य हर्शल पाटील, कारखाना व्हाईस चेअरमन भागवत पाटील, संचालक मिलिंद नेहेते, संचालक नरेंद्र नारखेडे, लीलाधर चौधरी, शालिनी महाजन, युवराज सरोदे, रमेश महाजन, शैला चौधरी, संजीव महाजन, सुरेश पाटील, नितीन चौधरी, नथू तडवी, माधुरी झोपे, निर्मला महाजन, संजय पाटील, भागवत पाचपोडे, प्रल्हाद बोंडे, बारसू नेहेते, कार्यकारी संचालक एस. आर. पिसाळ आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखाना कर्मचारी युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी केले व उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी मानले.















