मुबंई, – अजित पवार नाराज, प्रदेशाध्यक्ष बदलणार ते कोणाचं मंत्रिपद जाणार या सर्व चर्चना शरद पवार यांनी उत्तर दिलं. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरुये. त्यांना नाथाभाऊंची साथ मिळाली. कोरोनामुळे अजित पवार काळजी घेत आहेत. जे मंत्री आहेत ते तसेच असतील, बदल नाही. एक शब्दाने त्यांनी कसली अपेक्षा आहे, काय हवं असं नाथाभाऊ बोलले नाही. त्यांनी काहीच मागणी केली नाही. कोण मंत्री आहेत ते तसेच राहतील.जयंतराव यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करत आहे. अजित पवार नाराज, कशाला नाराज.. कोरोना काळात काळजी घ्यावी लागते. जनतेशी बांधिलकी आहे. जितेंद्र आव्हाड, मुंडे, बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाला सगळ्यांच्या बाबत काळजी घेत आहोत. अधिक खबरदारी घ्यावी म्हणून सहकारी आले नाही तर काही गडबड नसल्याचे सांगत पवारांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला.
त्यांनी’ ईडी लावली तर मी सीडी लावेल – खडसे
मला अनेक जण म्हणायचे तुम्ही पक्ष सोडला तर तर इडी तुमच्या मागे सीडी लावतील. त्यामुळे त्यांनी’ ईडी लावली तर मी सीडी लावेल, असा कडक इशारा खडसे यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावेळी भाजपला अप्रत्यक्षरित्या दिला.एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
आज मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित खडसे यांनी पक्ष प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना खडसे म्हणाले की, सलग चाळीस वर्ष पक्षाची सेवा केल्यावर देखील माझ्यावर अन्याय झाला… मला छळण्यात आलं. बाईला पुढे करून माझ्यावर खोटे विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला त्यामुळे आता अशांसोबत काम करणं शक्य नसल्याने आपण राष्ट्रवादी प्रवेश केला असून यापुढील काळात पक्षासाठी ताकदीनं काम करून दाखवेल असा शब्द देतो असं म्हणाले तर ज्या भूखंडाचा खोटे आरोप लावून मला बदनाम केले आता कोणी किती भूखंड घेतले हे यापुढे सर्वांच्या समोर येईलच असंही खडसे यावेळी म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलंलं जात होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला : खडसे
दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला असल्याचं एकनाथ खडसे प्रवेश करतेवेळी म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन. समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केलं. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचं असं वाटत होतं. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली हे सांगितलं.
जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न : एकनाथ खडसे
भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे भावूक होत म्हणाले की, ‘भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असं ते म्हणाले.
खडसेंच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे :
1988 – कोथळी गावचे सरपंच झाले.
1990 – मुक्ताईनगर चे आमदार बनले
1997 – भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले.
2010 – विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
2014 – भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले.
2016 – महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला
सिंधी समाजाचे नेते मा. आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांचा देखील राष्ट्रवादीत
सिंधी समाजाचे नेते माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी देखील आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
आज मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर याच वेळी नाथाभाऊ यांना मानणारे सिंधी समाजाचे नेते माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांचा देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.