Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ प्रांतकार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

najarkaid by najarkaid
May 18, 2020
in आरोग्य, जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ,(प्रतिनिधी) –  भुसावळ शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना बाधीतांच्या संख्येनंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी रविवारी दि.17 रोजी भुसावळ शहराला भेट देत कंटेन्मेन्ट झोनमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करून प्रांताधिकारी कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक घेतली.

या बैठकीत भुसावळ शहरातील परीस्थितीचा आढावा जाणून घेतला. याशिवाय जिल्हाधिकार्‍यांनी डेटिकेटेड कोव्हिड सेंटर म्हणून घोषित केलेल्या रेल्वे रुग्णालयाला भेट देऊन रेल्वेचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. तसेच
जिल्हाधिकार्‍यांनी ट्रामा केअर सेंटरला मॅटर्निटी सेंटर म्हणून वापरण्यास सुरुवात करण्याच्या सूचना केलेल्या असून कंन्टेमेंट झोनचा परीसर हा एक किमीचा असल्याने या परीसरातील नागरीकांची होणारी गैरसोय पाहता या परीसरातील अंतर कमी करण्यात येऊन या सर्वच कंटेन्मेन्ट झोनमधून कोणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ही यावेळी देण्यात आल्या.तसेच यापुढे कोरोना संशयीत अत्यावस्थ रुग्ण आढळून आल्यास त्याला तात्काळ जळगाव कोव्हिड रूग्णालयात पाठवावे, अन्यथा स्थानिक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या भुसावळच्या रेल्वे डेटिकेटेड कोव्हिड रूग्णालयात दाखल कयण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. भुसावळसह मुक्ताईनगर, यावल, रावेर, बोदवड, फैजपूर,सावदा आदी भागातील हायरिस्क रुग्णांना येथे हलवण्यात येणार आहेत.तसेच भुसावळ नगरपरिषदेला वैद्यकीय खर्चाची समस्या उद्भवल्याने चौदाव्या वित्त आयोगातून वैद्यकीय संसाधनांसाठी खर्च करण्याच्या परवानगीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच रेल्वेच्या डेटिकेटेड कोव्हिड रुग्णालयात उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या दवाखान्यात डॉक्टर,नर्सेस, औषधी,वार्डबाॕय,पीपीई किट्स सह इतर वैद्यकीय सेवा व संसाधनांचा तात्काळ पुरवठा करावा अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिलेल्या आहेत.भुसावळकर स्वयंस्फूर्तीने पाळत असलेल्या ४ दिवसीय जनता कर्फ्युचे जिल्हाधिकार्‍यांनी कौतुक करत आणखी कोरोनाबाधीतांची संख्या न वाढण्यासाठी शहरवासीयांनी घरातच थांबून लाॕकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे कोव्हिड रूग्णालयास भेट देऊन डीआरएम कार्यालयात डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशी रेल्वेच्या डेटिकेटेड कोव्हिड रूग्णालयातील उपलब्ध सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली.या बैठकीला प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, आमदार संजयभाऊ सावकारे, तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी करुणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड,भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ,नगराध्यक्ष रमण भोळे आणि नगरपालिका दवाखान्याच्या डॉ.किर्ती फलटणकर आदींची या आढावा बैठकीला उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनोज भालेराव यांना अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

Next Post

कोरोना संकटात उद्योग क्षेत्रांत मराठी तरुणांना मोठी संधी !

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
कोरोना संकटात उद्योग क्षेत्रांत मराठी तरुणांना मोठी संधी !

कोरोना संकटात उद्योग क्षेत्रांत मराठी तरुणांना मोठी संधी !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us