तापी उत्थान एवं उत्सव सेवा समितीने केले विधिवत पूजन
भुसावळ | शहराला वरदान लाभलेल्या तापी नदीचा जन्मोत्सव आषाढ शुद्ध सप्तमी ९ जुलै रोजी आहे. या नमित्ताने येथील तापी उत्थान एवं उत्सव सेवा समितीसह अन्य संस्थांच्या वतीने तापी जन्मोत्सवा निमित्त आज दि. ९ रोजी सकाळी १०.३० वाजता तापी नदीवरील इंजिन घाटाजवळ साजरा करण्यात आला . ब्राह्मणवृंद व मान्यवरांच्या हस्ते तापी नदीचे अर्ध्यपुजन करुन सुर्यपुत्री तापी मातेला साड़ी चुनरी फ़ळ नारळ प्रसाद वाहण्यात आला व विधिवत पूजन करण्यात आले.
यानंतर उपस्थितांना वृक्षाचे वाटप करण्यात आले प्रसंगी तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती संस्थापक अध्यक्ष प्रशांत वैष्णव यांनी तापी नदीचे धार्मिक तसेच भौगोलिक महत्व विषद केले . भुसाळात सार्वजनिक रित्या तापी नदी जन्मोत्सव साजरा करण्ययाचे १४ वे वर्ष आहे. हा उपक्रम तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती सह सप्तश्रृंगी माता बहुउद्देशीय संस्था, राजस्थानी विप्र महिला मंडळ, बहुभाषिक ब्राह्मण समाज मंडळ, नॅशनल युथ क्लब, राधे राधे प्रभात फेरी, भक्त मंडळ, श्री बालाजी महिला बचत गट, सखी श्रावणी महिला बहुउद्देशेय संस्था, बजरंग भजन मंडळ, आदी संस्थांतर्फे विविध धार्मिक व पर्यावरणा संबंधित कार्यक्रम घेण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी अभिलाष नागला उमेश नेवे,भारती वैष्णव, पंडित रविओम शर्मा, उमाकांत (नमा)शर्मा, दिलीप टाक, नितेश अग्रवाल,, राजस्थानी विप्र समाज व श्री राधाकृष्ण प्रभात फेरी के सदस्य मेघा प्रशांत वैष्णव संजय अग्रवाल, जगदीश अग्रवाल, अनूप अग्रवाल, अभिषेख नागला, राजश्री नेवे, पं.रवीओम शर्मा, जयप्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय रवींद्र पुरोहित, गोविंद अग्रवाल, मोटू वर्मा, अशोक धांडे, सुखदेव प्रसाद, चौरसिया, संतोष टाक, सोमनाथ चौरसिया, दिनेश महाजन, सचिन पाटील, महेश फालक, भक्ती वैष्णव, ऍड. मेघा वैष्णव, जे.बी. कोटेचा, उमेश नेवे, ज्योती शर्मा, संगीता शर्मा, श्रीकृष्ण चोरवाडकर , दिनेश सोनार, उमेश इखनकर, अक्षय वर्मा, कोमल नेवे, मानसी नेवे, विमल रामदास वैष्णव, नलीनी नेवे, समित अग्रवाल, निकेश अग्रवाल, सत्यनारायण शर्मा, दीपक जैन आदी उपस्थित होते