भुसावळ, (धम्मरत्न गणवीर) – शहरातील समता नगरातील एक रुग्ण कोरोना पॉज़िटिव असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी तातडीची आपत्कालीन बैठक घेऊन या भागासह सुमारे एक किलोमीटरचा परिसर १४ दिवसांसाठी सील करण्याचे निर्देश दिले असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले आहे.
या गांधी पुतळ्यापासुन ते कंडारीचा अर्ध्या भागाचा समावेश असेल या भागात फवारणीसह अन्य उपाययोजना करण्यात येणार असुन या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येणार आहेत. तर शहराच्या अन्य भागात मात्र असे कोणतेही निर्बंध नसतील असे प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले .















