जळगाव – जळगावच्या दोघांना पाच जणांनी मिळून लाकडी दाण्याने मारहाण करून सोन्याची चैन आणि रोकड लंपास करणाऱ्या चौघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली .
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, अमर विलास सोनवणे वय २२ रा. दयाराम नगर कोल्हे हिल्स हा व त्याचा मित्र रवी विजय चव्हाण हे दोन्ही २३ एप्रिल रोजी १० वाजता दुचाकीने मुक्ताईनगर येथे जात होते . दोन्हीजन भुसावळ येथे यावल रोडवरील होंडा शोरूमच्या अलीकडे चहाच्या टपरीजवळ थांबले असताना ११ वाजेच्या सुमारास पांढर्या डिझायर वाहनातून पाच जणांनी अचानक येत लाकडी दांड्यानी अमर आणि रवी या दोघांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली . यात दोघांच्या हात पायाला डोक्यावर इजा झाली . तसेच अमर सोनवणे यांच्या गळ्यातील ५ सोन्याची अंगठी,१० ग्राम वजनाची चैन आणि रोख ४ हजार ३६० रुपये चोरून नेले होते . याबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, पोहेकॉ रवींद्र पाटील, अनिल देशमुख,दीपक पाटील, अशोक वाघ , पोहेकॉ विजय पाटील, दिनेश बडगुजर,नरेंद्र वारुळे यांचे पथक मध्यप्रदेश,यावल , भुसावळ येथे रवाना केले होते . या पथकाने मध्यप्रदेशातील शिरवेल येथून प्रमोद काशिनाथ पाटील, रा. अकलूद ता. यावल , अंजाळे येथून गोंविंदा पंढरीनाथ सपकाळे, रा. अंजाळे ता. यावल, पिंपरी ता. यावल येथून विशाल आधार सपकाळे, दिनेश सोमा भिल रा. अकलूद ता. यावल यांना विविध ठिकाणांहून एकाचवेळी अटक करण्यात येऊन त्यांनी दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली . त्यांना पुढील कार्यवाहीसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.















