Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भास्कराचार्य गणित नगरी देशात गणितीय खगोल विज्ञानाची “काशी” ठरावी – खासदार उन्मेष पाटील

najarkaid by najarkaid
September 19, 2019
in जळगाव
0
भास्कराचार्य गणित नगरी देशात गणितीय खगोल विज्ञानाची “काशी” ठरावी – खासदार उन्मेष पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

भास्कराचार्य गणित नगरी कोनशिला अनावरण समारंभ उत्साहात
चाळीसगाव – गणित सूर्य भास्कराचार्यांचा अनमोल ठेवा दुर्लक्षित असून तो जगासमोर यावा यासाठी सर्वांच्या साक्षीने भास्कराचार्य गणित नगरीची संकल्पना मांडली . त्यासाठी  राज्यपाल ,मुख्यमंत्री,अर्थमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.राज्यपालांची भेट घेऊन या प्रकल्पाची गरज समजून सांगितली.

गणितज्ञ भास्कराचार्य यांचा अनमोल ठेवा आजमितीस विविध विषयांमध्ये भाषांतर करून पस्तीस देशांमधून अभ्यासाला जातो.मात्र आपल्या देशात भास्कराचार्य यांच्या अलौकिक कार्याचा प्रचार-प्रसार झालेला नाही. यासाठी भास्कराचार्य गणित नगरी साकारावी ही खूणगाठ बांधली. आज ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याने ही भास्कराचार्य गणित नगरी  गणित खगोलशास्त्रासाठी देशात विज्ञानाची “काशी” ठरावी अशी भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. आज भास्कराचार्य गणित नगरी कोनशिला समारंभ पाटणादेवी येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता.खासदार उन्मेष पाटील , कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे  कुलगुरू प्रा. डॉ. पी.पी.पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेष दादा पाटील बोलत होते. यावेळी प.पू.१००८ महामंडलेश्वर हभप ज्ञानेश्वर माऊली, जिल्हा परिषद  सभापती पोपट भोळे, भाजप तालुकाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, सभापती स्मितलताई बोरसे, नगराध्यक्ष आशालताताई चव्हाण,उपसभापती संजय पाटील, भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील,गटनेते संजय रतनसिंग पाटील, उमंग महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, नियोजन समिती सदस्य धर्मा वाघ,विभागीय वनाधिकारी आर.आर.काळे, गणितसूर्य भास्कराचार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ल.वी.पाठक, मानद वन्यजीव संरक्षक राजेश ठोंबरे , भास्कराचार्य ग्रंथ संपदा जाणकार  दिलीप गोटखिंडीकर , वास्तू विशारद शलाका गोटखिंडीकर, सुशांत पाटील, चैत्राली जुणागडे,सहाय्यक वनसंरक्षक एस.पी.काळे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, परिक्षेत्र अधिकारी एच.डी. चव्हाण, नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक महेंद्र पाटील, जी.प.सदस्या मंगलताई जाधव, मोहिनी गायकवाड, प.स.सदस्यदिनेश बोरसे ,सुनील पाटील, विश्वास चव्हाण , प्राचार्य एस.आर.जाधव, प्राचार्य डॉ. मिलिंद बिलदीकर,जगन महाजन, बाळासाहेब राऊत, गिरीश बरहाटेयांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गणित नगरी कडे देशाचे लक्ष
भास्कराचार्य गणित नगरी लवकर साकारली जावी यासाठी देशभरातून गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ प्रेमी यांची सारखी विचारणा सुरू आहे.लाखो पुस्तकांची  ग्रंथसंपदा व साहित्य  या ठिकाणी मोफत देण्यास तयार आहे. देशातील आगळीवेगळी करण्यासाठी तीनशेपेक्षा अधिक गणितज्ञांची मते जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला आणि अपेक्षित असलेले बौद्धिक टुरिझम या गणित नगरी च्या माध्यमातून साकारले जाणार आहे. भविष्यात विद्यापीठाचे उपकेंद्र या ठिकाणी व्हावे. यासाठी प्रयत्नशील राहणार असून अख्खे देशातील खगोल शास्त्रज्ञ व गणित प्रेमी अभ्यासकांचे लक्ष या गणित नगरी कडे लागले आहे अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
यावेळी विभागीय वनाधिकारी आर.आर.काळे यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले खासदार उन्मेष पाटील यांनी प्रशासन शासन यांची सांगड घातली. सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रात जागतिक कीर्तीची गणित नगरी साकारली जाणार असल्याने ही भूमी जागतिक पातळीवर आपले नावलौकिक मिळवून देणार आहे.
प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. ल.वी.पाठक यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की  खासदार उन्मेष पाटील यांनी या गणित नगरी साकरण्यासाठी स्वतः ला वाहून घेतले. शेकडो गणित तज्ञाची मते जाणून एक जागतिक पातळीवर मार्गदर्शक ठरेल अशी गणित नगरी लवकरच आकारास येणार आहे. मानद वन्यजीव संरक्षक राजेश ठोंबरे यांनी सांगितले की खासदार उन्मेष पाटील यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी असंख्य अडीअडचणी दूर केल्याने भास्कराचार्य यांचा वारसा जगासमोर येणार आहे. या पाटणादेवी भूमीत भास्कराचार्य यांनी लीलावती ग्रंथ लिहिला या जागेत देशातील खगोल शास्त्र गणित विषयाची अभिनव गणित नगरी साकारली जाईल. कुलगुरू प्रा. डॉ. पी पी पाटील यांनी सांगितले की भास्कराचार्य यांची ग्रंथ संपदा आजही दुर्लक्षित राहिली आहे. त्यामुळे ही गणित नगरी त्यांची ओळख जगासमोर येणार आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या सारखा जागरूक लोकप्रतिनिधी असले की आपल्या भागाचा विकास होतो.या गणित नगरी साठी जी मदत विद्यापीठ स्तरावरून लागेल ती देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सूत्रसंचालन अमोल नानकर यांनी तर आभार सहाय्यक उप वनसंरक्षक एस व्हीं काळे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील यांचा सत्कार

Next Post

हिंगोणा येथे शहीद स्मारकाचे  लोकार्पण

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
हिंगोणा येथे शहीद स्मारकाचे  लोकार्पण

हिंगोणा येथे शहीद स्मारकाचे  लोकार्पण

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us