बोदवड, (प्रतिनिधी)- तालुक्यातील भानखेडा येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठान विहिरीत मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे त्यामुळे गावात दुर्गंधी पसरत आहे व यामुळे गावात संसर्गजन्य आजार लागन होण्याच्या भितीने नागरीक त्रस्त आहेत या विहिरीच्या परिसरात चारही बाजुने ५० फुटाच्या अंतरावर हनुमान मंदीर ,महादेव मंदीर , भवानी मंदीर व सभा मंडप आहे व दैनंदीन या मंदीरावर व सभा मंडपावर उन्हामुळे दुपारच्या वेळेस व संध्याकाळी नागरीक थांबत असतात व या विहिरीतील घानीमुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.कोरोना संसर्गाच्या काळातही ग्रामपंचायतने याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.
बोदवड तालुक्यात स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडूनआवाहन करण्यात येऊन गाव स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, तालुक्यातील भानखेडा येथे वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन गावठान विहिरीत अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.
शासनाच्या निधीचा काय उपयोग
सध्या करोना सारख्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नागरिक कोरोना पासून बचावाकरिता सांगण्यात येणाऱ्या उपायांचे नियोजन गांभिर्याने करण्यावर भर देत आहेत. मात्र कोरोनाला रोखण्याकरिता नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना या कोरोनाला रोखण्यास फायदेशीर ठरतीलही. मात्र हेच होत असताना भानखेडा गावातील विहिरीत असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे गाव वासीयांना भोगावे लागतील. हे गावाच्या अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या भितीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे.— तसेच भानखेडा ग्रामपंचायतीचे याकडे जानीव पुर्वक दुर्लक्श होत आहे ग्रामपंचायतीकडुन स्वच्छते विषयी उदासीनता दिसुन येत आहे
शासनाने ठोस पावले उचलावीत
तेव्हा नागरिक शासन-प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशाप्रकारे नागरिकांच्या जिवित्वाशी खेळण्याच्या चालविलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? अन या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनानेच ठोस अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे. तरी या गावठान विहिरीतील कचरा गाळ काढुन स्वच्छता करावी अशीही मागणी नागरीकांची आहे.















