जळगाव,(प्रतिनिधी)- मोदींच्या नेतृत्वार विश्वास ठेवत काँग्रेसचे नेते डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या कन्या डॉ. केतकी पाटीलसह पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज दिनांक २४ रोजी ठीक २ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व कन्या डॉ. केतकी पाटील हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे वृत्त ‘नजरकैद’ ने कालच प्रसिद्ध केले होते.दरम्यान भाजपा प्रवेशापूर्वीच काँग्रेसकडून डॉ उल्हास पाटील यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केल्याच्या कारवाईमुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान आज भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील व जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मुबंईत भाजपा मध्ये प्रवेश केला असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातं आहे.
















