जळगाव,(प्रतिनिधी)-: भारतीय जनता पक्षाच्या टॉप दहा खासदारांपैकी एक असलेले खासदार उन्मेषदादा पाटील यांनी खासदाकीचा राजीनामा दिला,निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश केला असून त्यांच्या सोबत युवा नेते पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करणदादा पवार यांनीही पक्ष प्रवेश केला आहे दरम्यान पक्ष प्रवेशानंतर जळगाव लोकसभा करिता करण पवार यांना उमेदवारी देखील जाहीर झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर उन्मेष पाटील यांनी भाजपा समोर तगडा उमेदवार देऊन ‘पॉवर गेम’ खेळला आहे.

दोघा दादांची यारी… जळगाव लोकसभेत लढत होईल भारी
भाजपाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिल्याने उन्मेष पाटील व त्यांचे समर्थक नाराज होते,दरम्यान आज दोघांही दादांनी ‘शिवबंधन’ बांधल्या नंतर जळगाव लोकसभेतून करण पवार सारखा पॉवरफुल युवा नेत्याला तिकीट जाहीर झाल्यानंतर जळगाव लोकसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना उबाठा अशीच सरळ लढत होणार आहे.विद्यमान खासदार उन्मेष पाटील व युवा नेते पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांची राजकीय मैत्री तर आहेचं पण दोघे खाजगी जीवनातही चांगले मित्र असल्याने ‘दोघा दादांची यारी… जळगाव लोकसभेत लढत होईल भारी असंच चित्र दिसतं असलं तरी भाजपावर पडेल का भारी हे मतदारचं ठरवणार आहे.
बदला घेण्याचं राजकारण वेदनादायी ; उन्मेष पाटील
भारतीय जनता पक्षात बदला घेण्याची राजनिती अत्यंत वेदनादायी आहे, सतत करण्यात आलेली अहवेलना ही स्वाभिमान दुखावणारी आहे,. त्यामुळे स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले आहे
जळगावच्या शिवसेना उबाठा पक्षात जल्लोष
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपाचा विद्यमान खासदाराने शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले व पक्ष प्रवेश केल्याने जळगाव जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढल्याने आणि भाजपाला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार मैदानात उतरविल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
उध्दव ठाकरे काय म्हणाले…
उध्दव ठाकरे म्हणाले. “वापरा आणि फेकून द्या ही भाजपची भूमिका आहे, त्यामुळे तुम्ही काम करूनही तुमची किंमत त्यांनी केलेली नाही, मात्र आज तुम्ही जनमताच्या प्रवाहात आला आहात. जळगावात आमच्यासोबतही गद्दारी झाली आहे. तुमच्या प्रवेशामुळे आता जळगाव लोकसभेत शिवसेनेचा अस्सल भगवा विजयी होईल,”










