मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून BJP भाजपात जाणार असल्याची माहिती खुद्द माजी मंत्री आमदार Eknath khadse यांनी दिली होती त्यांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त लोकसभा निवडणुकीनंतर होता मात्र अद्यापही भाजपमध्ये प्रवेश होत नसल्याने खडसेनां वेटिंग करावं लागत आहे. त्यामुळं पुन्हा भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. Eknath khadse यांचे भाजप आमदार माधुरी मिसाळ (madhuri misal) यांच्या सोबत चर्चा करतानाचा व्हिडिओ मराठी वृत्त वाहिनी ABP माझाने प्रसिद्ध केला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Viral) होतं आहे.
https://youtube.com/shorts/qo-VY4kBxE4?si=e6CWQ4E7VVfLATWk
यावेळी दोघांमधील चर्चा रेकॉर्ड झाली आहे. यात Eknath khadse हे माधुरी मिसळ यांच्या बोलताना मागून येणाऱ्यांना संधी मिळते. नव्याने संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना दिसून आले. त्यामुळे BJP भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.या संभाषणावेळी आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. आता एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य नक्की कोणाला उद्देशून केले, याबाबत राजकीय वर्तुळात (political circle )तर्कवितर्क लावले जात आहेत.
https://youtu.be/JlxrsUqDx-s?si=hZ8lNHiT2G-2-Br3
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे(eknath khadse) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत. अलीकडेच झालेल्या (loksabha election) लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याआधीच त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे(Raksha khadse) यांच्यासाठी प्रचार केला होता. रक्षा खडसे या रावेर लोकसभा (raver loksabha) मतदारसंघातूनसलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णीही लागली. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अद्याप एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर आहेत पण बीजेपीत प्रवेश होत नाही.या भेटीनंतर एकनाथ खडसेंचा भाजपात प्रवेश होऊन विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा सुरु असतांना एकनाथ खडसेंचा पक्ष प्रवेश भाजपच्या एका गटाला दिलेला शह असेल म्हणून तर पक्ष प्रवेश होतं नसावा अशी देखील चर्चा आहे. असं असलं तरी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंनी भेट घेतल्याने एकनाथ खडसे (eknath khadse) यांचा भाजप प्रवेश कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.










