Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा १६ जानेवारीस वितरण सोहळा 

najarkaid live by najarkaid live
January 13, 2024
in जळगाव
0
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा १६ जानेवारीस वितरण सोहळा 
ADVERTISEMENT

Spread the love

  • कांताई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकरांना
  • अशोक कोतवाल यांना बालकवी ठोमरे पुरस्कार, 
  • श्रीमती सुमती लांडे यांना बहिणाबाई पुरस्कार
  • तर सीताराम सावंत यांना ना.धों महानोर पुरस्काराने होणार सन्मान

जळगाव, दि. १३ (प्रतिनिधी) – जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ सुप्रसिद्ध नाटककार पद्मश्री. सतीश आळेकर यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती सुमती लांडे, श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. अशोक कोतवाल तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. सीताराम सावंत यांना दि.१६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ला, कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे सन्मानपूर्ण वितरीत करण्यात येणार आहे. ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली, सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास असेल. या सह या सोहळ्यास निवड समितीचे सर्व सदस्यही उपस्थिती देणार आहेत. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.

‘भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.

जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङ्मय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते.

कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना तर दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना प्रदान करण्यात आला आहे. साहित्य कला क्षेत्रातील मानाचे पान असणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यप्रेमी,

रंगभूमी कलाकार, कलाप्रेमींनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पुरस्कारार्थींचा थोडक्यात परिचय

सतीश आळेकर –  ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहिर झाला ते सतीश आळेकर यांनी पुण्याच्या ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे काम केले आहे. याशिवाय रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी काम केले आहे. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ‘ओळख’, ‘काळोख’ या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. सतीश आळेकर यांनी ‘चिंटू’, चिंटू-२, ‘व्हेंटिलेटर’, भाई,भाई-२, मी शिवाजी पार्क, अय्या, चि व चि सौ कां, राजवाडे अँड सन्स, स्माईल प्लिज, हाय वे, देऊळ बंद, जाऊंद्याना बाळासाहेब इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. रंगभूमीप्रमाणेच ‘जैत रे जैत’ चित्रपटाची पटकथा, ‘देखो मगर प्यार से’ ही दूरदर्शन मालिका, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. रंगभूमीवरील कारकीर्द आणि नाट्यकृतींचा आढावा घेणारे ‘गगनिका’ हे आत्मकथन चर्चेत आहे. त्यांच्या कार्याबाबत २०१२ मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरविले गेले.

2) सुमती लांडे –  साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सुमती लांडे यांचे कमळकाचा, वाहेत अंतर, कमळकाचा: कावप्रत्यय कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. साहित्य क्षेत्रात कवयत्री, लेखिका,संपादक, प्रकाशक, ग्रंथ प्रसारक, ग्रंथ वितरक म्हणून सुमती लांडेचे कार्य आहे. शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रंथप्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. सुमती लांडे यांनी स्त्री वाद, स्त्री-पुरूष नातेसंबंध, वाड्मयीन चळवळी आणि दृष्टीकोन, पुरूष आकलनातला-अनुभवातला यांचे संपादन केले आहे.

3) सीताराम जगन्नाथ सावंत – इटकी ता. सांगोला जि. सातारा येथील रहिवाशी सिताराम सावंत रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. ‘नामदार’, ‘लगीन’, ‘देशोधडी’, ‘भुई भुई ठाव दे’ अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कादंबरी, ‘काव्यार्य’ संपादन व ‘पांढर’ आणि ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रहाने सिताराम सावंत यांनी मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवले आहे. शेतकरी, शिक्षक आणि लेखक हा प्रवास करताना शेतमालकांचे जमिनीचे ‘काळीज’ हातांमधून गेल्यानंतर त्यांच्या मनांचा तीव्रकोमल कोलाहल टिपणारी ‘भुई भुई ठाव दे’ कादंबरी व ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रह सध्या मराठी विश्वात बहुचर्चित आहे. स्वतः अभियंता अर्हताप्राप्त असणाऱ्या या लेखकाने कठोर विचार करून आणि विवेकाची नीट मशागत करून ‘स्थावरजंगम’ विषयावर कादंबरीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.

4) अशोक कोतवाल – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य राहिलेले अशोक कोतवाल (जळगाव) यांचे ‘मौनातील पडझड’, ‘कुणीच कसे बोलत नाही’, ‘नुसताच गलबता’, ‘खांदे सुजलेले दिवस’, हे कवितासंग्रह तर ‘प्रार्थनेची घंटा’, ‘सावलीचं घड्याळ’, ‘दालगंडोरी’ हे ललित लेखसंग्रह, ‘घेऊ या गिरकी’ हे बालकविता यासह पुणे सुविद्या प्रकाशनाचे ‘खानदेशचे काव्यविश्व’  हे संपादन केले आहे. यातील ‘प्रार्थनेची घंटा’, ‘झडीचा पाऊस’, ‘दालगंडोरी’ ह्या साहित्यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुजरातमध्ये पैशांची त्सुनामी, आता एवढी गुंतवणूक, 166 देश राहतील मागे

Next Post

दोन महिन्याच्या चिमुकलीला कॅन्सरची गाठ, मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाने शस्रक्रियेसाठी केली १ लाखाची मदत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दोन महिन्याच्या चिमुकलीला कॅन्सरची गाठ, मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाने शस्रक्रियेसाठी केली १ लाखाची मदत

दोन महिन्याच्या चिमुकलीला कॅन्सरची गाठ, मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाने शस्रक्रियेसाठी केली १ लाखाची मदत

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us