आ.किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पाचोरा :- भडगाव तालुक्यातील कजगाव परिसरात जून २०१८ मध्ये राञीच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाला जोरदार सुरुवात होऊन झालेल्या वादळी पावसामुळे कजगाव, वाडे, घुसर्डी, पासर्दी, बांबरुड प्र.ब., लोण प्र. ब. या परिसरातील केळी बागा जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना शासनाकडून अखेर ४३ हजार ५०० रुपये हेक्टरी या प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर झाली असून भडगाव तहसिलदार कार्यालयास २८ लाख ५६ हजार ५५५ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.दरम्यान याबाबत आ.किशोर पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेत हा मुद्दा लावून धरला होता. प्रशासनाने देखील वेळीच पंचनामे करत नुकसान भरपाई साठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.
याबाबत माहीती अशी की दि २ ते ६ जून २०१८ दरम्यान झालेल्या पूर्व मोसमी पावसाने कजगाव व परिसराला चांगलेच झोडपले होते. पावसासह मोठया प्रमाणावर वादळी वारा होता या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यात शेतकऱ्यांच्या केळी पिकाला सर्वाधिक फटका बसला बसत केळी चे झाडे जमीन दोस्त झाल्याने सुमारे पंधरा ते वीस लाखांचे नुकसान झाले होते. प्रशासनाच्या महसूल व कृषी विभागाने संयुक्त पणे तात्काळ नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करीत पंचनामे केले होते.
शेतकऱ्यांनाना दिलासा- गेल्या वर्षी वादळी पावसामुळे झालेल्या केळी बागा जमिनदोस्त झाली होती कापणीवर आलेल्या बागा नुकसान होऊन तोंडी आलेला घास हिरावला गेला होता यामुळे पन्नास ते साठ टक्के नुकसान होऊन आर्थिक फटका बसला होता नुकतेच शासनाकडून नुकसान ग्रस्त केळी उत्पादक शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.