Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग ; प्राप्तिकर विभागाने मडगाव येथील हवाला ऑपरेटरकडून 6 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम केली जप्त

najarkaid live by najarkaid live
January 29, 2022
in राज्य
0
ब्रेकिंग ; प्राप्तिकर विभागाने मडगाव येथील हवाला ऑपरेटरकडून 6 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम केली जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक तयारीची देखरेख सुरु असताना, प्राप्तिकर विभागाने, आज २९ रोजी, गोव्याच्या पोलीस महानिरीक्षकांकडून मिळालेल्या  विशिष्ट माहितीवरून, मडगाव येथे छापे टाकले. हवाला ऑपरेटरच्या मडगाव येथील निवासस्थानी ही रोकड  असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार प्राप्तिकर  विभागाने वॉरंट बजावले आणि प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान, हवाला ऑपरेटरने रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी त्याच्या निवासस्थानी एक छुपी पोकळ जागा  बनवल्याचे आढळून आले, ज्यामध्ये रोख रक्कम सापडली होती. शिवाय, त्याच्या निवासस्थानी पार्क करण्यात आलेल्या  कारमधील छुप्या भागात  रोख रक्कम ठेवल्याचे देखील आढळून आले. जो विशेषतः रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आला होता.

झडती  आणि जप्तीच्या कारवाईत 6.20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. विभागाने चौकशी केली असता, हवाला ऑपरेटरने रोख रक्कम हवाला रक्कम असल्याचे सांगितले. तो गोव्यातील हार्डवेअर व्यापाऱ्यांसाठी हवाला व्यवहार करतो. मात्र, हवाला ऑपरेटरच्या जबाबात अनेक प्रकारची विसंगती आढळून आली  आणि असे मानले जाते की ही रोख रक्कम गोव्यातील  आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडण्यासाठी मतदारांना वाटण्यासाठी होती. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

निवडणुकीदरम्यान, मतदारांना रोख रकमेचे वाटप  त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी केले जाते, त्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीच्या उद्दिष्टांवर विपरित परिणाम होतो. बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आल्यामुळे त्याचा निवडणूक हेतूंसाठी वापर होण्याची शक्यता कमी होईल आणि गोवा राज्यात मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांच्या आयोजनाला मदत होईल. प्राप्तिकर विभागाने देखरेख यंत्रणा सतर्क केली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान रोख रकमेच्या व्यवहारांवर  बारीक लक्ष ठेवले जात आहे.

मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी  किंवा लाच देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रोकड आणि इतर वस्तूंच्या हालचालींबाबत तक्रारी/माहिती  नोंदवण्यासाठी प्राप्तिकर  विभागाने तिसरा मजला, ट्रिस्टार बिल्डिंग, पट्टो, पणजी, गोवा येथे एक 24×7 नियंत्रण कक्ष देखील स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षाशी टोल फ्री क्रमांक 1800-233-3941 किंवा मोबाईल क्रमांक 8275803725 आणि 9403809343 किंवा goaelections@incometax.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशांनो लक्ष्य द्या! ‘या’ गाड्या १२ फेब्रुवारीपर्यंत रद्द, वाचा गाड्यांची यादी

Next Post

अमृता फडणवीसांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचलं ; म्हणाल्या नॉटी नामर्द… अजून काय म्हणाल्या वाचा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अमृता फडणवीसांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचलं ; म्हणाल्या नॉटी नामर्द… अजून काय म्हणाल्या वाचा

अमृता फडणवीसांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचलं ; म्हणाल्या नॉटी नामर्द... अजून काय म्हणाल्या वाचा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us