जळगाव,(प्रतिनिधी)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांची पाच चार दिवसापूर्वी झालेली बदली प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. गिरीष ठाकूर यांच्याकडेच राहणार आहे, याबाबतचे शासन आदेश दिनांक २४ रोजी शासनाने काढले आहेत.
अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांचं यामुळेचं कमबॅक
जळगाव येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यक्षम आणि परिणामकारक प्रशासन चालविण्यात अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांना यश आले असल्याने व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्यास प्रभाविपणे काम त्यांच्या कार्यकाळात सुरु आहे. त्याच बरोबर त्यांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी असो की नागरिक यांच्या तक्रारी सुद्धा नसल्याने त्यांच्या कामाची पावती म्हणून शासनाने त्यांची बदली आदेश रद्द करून पुन्हा जळगाव शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा पदभार दिला असावा.
शासनाने दिनांक २० जून २०२४ रोजी प्रशासकीय कारणास्तव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. गिरीष ठाकूर, प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांच्याकडून संपुष्टात आणून डॉ. सदानंद भिसे, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला होता.
मात्र आता प्रशासकीय कारणास्तव सदरहू दि.२०.०६.२०२४ रोजीचे आदेश पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. गिरीष ठाकूर, प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांनी तात्काळ साभाळावा व डॉ. सदानंद भिसे, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी यांनी मुळ नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे असे आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,शंकर जाधव,उप सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २४ जून रोजी काढले आहेत.