बिहार – बिहार विधानसभेच्या जागांच्या निकालामध्ये राज्यातील सत्ताधारी एनडीएने स्पष्ट बहुमताचा १२५ जादूई आकडा गाठला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात विरोधी पक्ष महाठबंधनला ११० जागांवर यश मिळाले आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) भाजपाने ७४,जनता दलने (युनायटेड) ४३, विकास इंसान पार्टीने (व्हीआयपी) ४ आणि हिंदुस्तानी आम मोर्चाने (डब्ल्यूई) ने ४ जागा जिंकल्या.
महागठबंधन – आरजेडी ७५, कॉंग्रेस १९, माकप (एमएल) १२, माकप ०२,
इतर – एआयएमआयएम ०५, बीएसपी ०१, एलजेपी ०१, अपक्ष ०१ असा निकाल समोर आला आहे.














