Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in राज्य, राजकारण
0
बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- भाजप-शिवसेना युतीमध्ये झालेली चर्चा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली होती. भाजपसाठी ती बंद दाराआडची चर्चा असेल. पण आमच्यासाठी ती सामान्य खोली नाही, मंदिर आहे. मंदिरात झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही खोटं बोलणार नाही,’ असा घणाघात शिवसेना नेते  संजय राऊत यांनी आज केला. 

समान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत आलेल्या दुराव्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी प्रथमच भाष्य केलं होतं. ‘आमच्या महायुतीला निवडणुकीत यश मिळालं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं मोदींनी सार्वजनिक व्यासपीठावर अनेक वेळा सांगितलं होतं. त्याचवेळी शिवसेनेनं विरोध का केला नाही. आता ते नवी मागणी करू लागले, ती आम्ही मान्य करू शकत नाही,’ असं शहा म्हणाले होते. बंद दाराआड झालेल्या गोष्टी शिवसेनेनं चव्हाट्यावर आणल्याचा आरोपही शहा यांनी केला होता.

शहा यांच्या या वक्तव्याला राऊत यांनी आज उत्तर दिलं. ‘बंद दाराआड ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी होत नसल्यामुळं त्या चव्हाट्यावर आल्या आहेत’, असं राऊत म्हणाले. ‘शिवसेनेनं कधीही खोटारडेपणाचा आधार घेऊन राजकारण केलेलं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं उद्धव ठाकरे देखील जाहीर व्यासपीठांवर सांगायचे. त्यावर भाजपनंही कधी आक्षेप घेतला नव्हता. लोकसभेपर्यंत सगळे शांत होते. विधानसभेचा निकाल लागला की लगेच फिरले,’ असं राऊत म्हणाले.

भाजप-शिवसेनेमधील युतीची चर्चा जिथं झाली होती, ते आमच्यासाठी पवित्र स्थान आहे. अटलबिहारी वाजपेयींपासून आडवाणींपर्यंत देशातील दिग्गज नेते जिथं येऊन बाळासाहेबांशी चर्चा करायचे. आजही अनेक लोक ज्या खोलीत नतमस्तक होतात, तिथं ही चर्चा झाली होती. ती कोणी नाकारत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे. शिवसेना व्यापारी वृत्तीची नाही. आम्ही कधीही कुणाचा ओरबाडून घेतलेलं नाही. महाराष्ट्र ओरबाडून खात नाही. महाराष्ट्र देणारा आहे,’ असंही राऊत यांनी यावेळी सुनावलं.

शिवसेनेला धमक्या देऊ नका!

राऊत यांनी यावेळी भाजपला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला. ‘आम्हाला कोणीही धमक्या देऊ नका. त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही प्राण देऊ, पण घाबरणार नाही. धमक्या देणाऱ्यांनाही संपवू,’ असा इशारा त्यांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक

Next Post

राफेल विमान खरेदीला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
राफेल विमान खरेदीला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट

राफेल विमान खरेदीला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us