Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवां सोबत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

najarkaid live by najarkaid live
March 25, 2024
in जळगाव
0
बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवां सोबत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी. समाजातील प्रत्येक घटकाला उत्साहाच्या रंगात रंगवणारा उत्सव अशीही होळीची ओळख आहे डोंगरदऱ्यात वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या बंजारा समाजात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. सध्याच्या युगात बंजारा समाजाने आधुनिकतेची कास धरली असली तरी बंजारा समाजामध्ये या सणाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

एक महिन्यापासून या सणाची तयारी बंजारा समाजातील महिला, पुरूष करत असतात.होळी धुलिवंदन साजरे करण्याकरीता बंजारा समाजामध्ये एक वेगळी परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरूच आहे. या सणाला सर्व नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र येउन मोठ्या आनंदाने पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा करतात. आपल्या अनोख्या परंपरेमुळे वेगळी आणि रंजक वाटणाऱ्या बंजारा होळीची लोकप्रियता आधुनिक काळातही कायम आहे. बंजारा समाजात साधारणतः तिन दिवस होळी साजरी केली जाते मुक्ताईनगर तालुक्यात टाकळी,मोरझिरा, धामणगाव, नविन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावात बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे.या गावात बंजारा समाज बांधव मोठ्या उत्साहात होळी साजरी करतात.

माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे हे गेल्या तीस वर्षापासून नियमित होळीला या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांच्या आनंदात सहभागी होऊन होळी साजरी करत असतात. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा गेले चार वर्षांपासून आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यां समवेत धुलीवंदनाच्या दिवशी या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांसोबत धुलीवंदन साजरे करतात.
यावर्षी सुद्धा रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बंजारा वस्ती असलेल्या टाकळी,मोरझिरा, धामणगाव, नविन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवां सोबत धुलीवंदन साजरे केले. यावेळी रोहिणी खडसे यांनी बंजारा समाज भगिनी सोबत डफाच्या तालावर पारंपारिक बंजारा लोकगीतांच्या चालीवर नृत्यात सहभागी होऊन बंजारा समाज भगिनींचा आनंद द्विगुणित केला व त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आपल्या देशात प्रत्येक जाती जमाती धर्म, समाजात सण आणि उत्सव साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पारंपारिक परंपरा, पद्धती आहेत. यात विशेषतः उत्सवप्रिय असलेल्या बंजारा लोकसंस्कृतीमध्ये होळी धुलीवंदन उत्सवाला विशेष महत्व आहे. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या अनोख्या परंपरा बंजारा समाज बांधव जोपासत असतात यामध्ये ‘पाल’ ,’गेर’ ,’फगवा’ , ‘धुंड’ अशा परंपरा जोपासल्या जातात.

आज दरवर्षी प्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील बंजारा समाज बांधवांसोबत होळी ,धुलीवंदन साजरे करून त्यांना शुभेच्छा दिल्याहा सण साजरा करण्यासाठी सर्व बंजारा समाज बांधव गावात तांड्यावर एकत्र येतात त्यामुळे या सामुहिक उत्सवामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन घडते. लोकगीतं हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण आहेत. होलिकोत्सवाकरीता महिला पारंपारिक पेहराव धारण करून बंजारा, लेंगी असे वेगवेगळे लोकगित सादर करतात. या लोकगीतांमधुन परंपरागत चालत आलेल्या रितीरिवाजाची जपवणूक करण्याबरोबरच सामाजिक सलोखा ठेवण्याचा संदेश दिला जातो.

तांड्यात होळी महोत्सवातून थोर संतांच्या विचारांचा जागर करून प्रचार व प्रसार करणे, पर्यावरणाच्या संतुलनातून मानवी कल्याण कसे साध्य होईल, याविषयी जनजागृती करणे आणि बंजारा संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन करून ती पुढच्या पिढीला अवगत करणे, हा समाज धुरीणांचा हेतू असतो.समाजाची प्रगती साधण्यासाठी व बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी हा उत्सव, बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे असे म्हणता येईल. असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन, बाजार समिती संचालक प्रविण कांडेलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल रोटे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मुन्ना बोंडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा भाऊ पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजनाताई कांडेलकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, माजी जि प सदस्य निलेश पाटिल, प्रदीप साळुंखे, बाळा भालशंकर, बबलू सापधरे, प्राजक्ता चौधरी, भैय्या पाटील, मयुर साठे, योगेश काळे, वसंता पाटील, विनोद काटे, सुरेश तायडे, बाळा सोनवणे, महेश भोळे, संदीप पाटील, रसाल चव्हाण, कांतीलाल चव्हाण, बाळू जाधव, राजू चव्हाण, जितेंद्र चव्हाण, हरलाल राठोड, छगनलाल राठोड, इंदल राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असतांना स्फोट ; आग लागून चार भावंडांचा मृत्यू

Next Post

उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा ‘होळी धमाका’ !

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा ‘होळी धमाका’ !

उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा 'होळी धमाका' !

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us