Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्लेग ते कोरोना आणि क्रांतिकारी विचारांचे महात्मा फुले

najarkaid live by najarkaid live
November 27, 2020
in संपादकीय
0
प्लेग ते कोरोना आणि क्रांतिकारी विचारांचे महात्मा फुले
ADVERTISEMENT

Spread the love

कोरोनाने अजून आपणांस मुक्त केलेलं नाही,सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉक डाऊन होऊ शकते.१८९७ साली जे लोक सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ?.असे विचारात होते तेच लोक आज मंदिर,शाळा सुरू करण्यासाठी आंदोलन करत आहेत. ते सुरू झाले की त्यात हजारो निरपराध लोकांचा बळी गेल्यावर पुन्हा हेच लोक सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी उभे राहतील.यांचा एकच उद्देश असतो सर्व सत्तेवर नियंत्रण ठेवणे. त्यांचा इतिहास पुन्हा पुन्हा वाचा विसरू नका.
पुण्यात प्लेगची साथ १८९७ ला सुरू होऊन ती सर्वत्र पसरली होती. त्यात बहुसंख्येने लोक बळी जात होते.पुण्यात प्लेगची साथ पसरल्या नंतर १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला.तेव्हा पुण्यात नव्हे तर देशात जाती व्यवस्था भयंकर होती. माणसाला माणसाच्या सावलीचा सुद्धा विटाळ होत होता,त्यावेळी प्लेगचा रुग्ण शोधण्यासाठी ब्रिटिशांनी सैनिकांना घरा घरात घुसून रुग्ण शोधण्याचा आदेश दिला. भटा ब्राम्हणांनी त्याला तीव्र विरोध केला होता. जे ब्रिटिश सैनिक रुग्ण शोधण्याचे काम करीत होते, रुग्ण भेटला की त्याला फरफटत नेत होते.माणूस वाचला पाहिजे त्यामुळे प्लेगची साथ रोखण्यासाठी हे करणे अत्यावश्यक होते.याचं एका उद्धेशाने ब्रिटिश सैनिक कर्तव्य म्हणून काम करीत होते. पण भटा ब्राम्हणांना फक्त जात दिसत होती. त्यांची अपेक्षा होती घरात घुसतांना बूट,सुरक्षा किट बाहेर काढून घरात प्रवेश केला पाहिजे.देव घरात लपलेल्या बाई माणसाला पाया पडून विनंती केली पाहिजे.यामुळे कोण्या चाफेकर बंधूने ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या हा इतिहास खूप चमचमीत मीठ मसाला घालून फोडणी देऊन लिहला गेला.आणि सांगितल्या जाते.पण जीव धोक्यात घालून प्लेग रुग्णांची सेवा करणाऱ्यांची माहिती लिहल्या गेली नाही. 
प्लेग रुग्णांला डॉक्टर,नर्स,पालिका कामगार कर्मचारी या सेवा देणाऱ्यांचा इतिहास फारसा लिहला नाही.याच प्लेगाच्या साथीत अडकलेल्या लोकांचे हाल पाहणे सहन झाले नाहीत.म्हणून सावित्रीबाई फुले घरा बाहेर पडून त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुणे शहरा जवळील ससाणे यांच्या माळावर हॉस्पिटल सुरू केले. त्या स्वतः रोग्यांना धीर देऊ लागल्या. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागल्या. कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. पण रोग्यांचा उपचार करता करता सावित्रीबाईंनाही प्लेगने गाठले आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला “स्त्रियांनी शिकावे” हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. “अनाथांना आश्रय मिळवा” हे ही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई ज्योतीराव फुले जन्म ३ जानेवारी,मृत्यू १० मार्च १८९७. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले जन्म ११ एप्रिल १८२७,मृत्यू २८ नोव्हेंबर १८९०.
भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना असंघटीत कामगारांना संघटित करण्याची प्रेरणा देणारे आणि भारतात महिलांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यास सतत प्रेरणा देणारे ज्योतीराव गोविंदराव फुले म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले,ग्रामीण भागात आजही जोतीराव ज्योतीराव नाही तर ज्योतिबाच म्हटल्या जाते. भटा ब्राम्हणांनी मराठा
ओबीसी मागासवर्गीय समाजात एक म्हण पेरून ठेवली आहे.ती म्हणजे “हाले डुले महात्मा फुले”  माथाडी कामगारात विशेष कोल्हापूर,सांगली,सातारा, पुणे,नगर जिल्ह्यातील कामगार मंडळी या म्हणीचा जास्त शब्द प्रयोग करतात. त्यांना महात्मा फुले यांचा ऐतिहासिक इतिहास माहीत नाही.त्यांना तो होऊ नये याची काळजी आज ही, ब्राम्हण,बनिया मिडिया घेत आहे.म्हणूनच ते असे म्हणतात.देश कोरोनाच्या महासंकटात असतांना रामायण महाभारत दूरदर्शन वर दाखविण्याचे कारण काय?.मंदिर,शाळा सुरू करण्यासाठी आंदोलने का?.
ज्योतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला.त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होते.विषमता, असमानता अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमी लढणारा माणूस त्यावेळी सनातनी भटा ब्राम्हणांच्या हिट लिस्टवर होता.त्यामुळे त्यांना जागोजागी संकटाचा सामना करावा लागे.यावर त्याने बुद्धीचातुर्याने मात केली.आजच्या सारखी जीवघेणी नीतिमत्ता नसलेले हिंसाचारी लोक तेव्हा नव्हते असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यावेळची परिस्थीती आम्ही वाचली आहे पण आज लोकशाही असूनही प्रशासकीय व्यवस्थेतील मनुवादी किती हिंसक पणे मागासवर्गीय समाजाच्या तरुणांना वागणूक देतात.ते सोशल मीडियावर पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. मग ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन मुलीची शाळा काढून किती मोठा संघर्ष केला असेल यांची कल्पनाच केल्या जात नाही. 
आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही महापुरुष,महात्मे शोधून ही सापडणार नाहीत.काही शिक्षण सम्राट आहेत पण त्यांच्या कडून कोणताही आदर्श घेण्याच्या लायकीचे ते नाहीत. शिक्षण देऊन नोकरी देण्याचे सामर्थ निर्माण करीत नाही, तर उपास,नवस,पायी पदयात्रा करून नोकरी मागतात.स्वतःच्या सरकार विरोधात आरक्षणा करीता आंदोलने करतात.
 ज्योतीराव फुले उत्तम बिल्डर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक होते हे आम्ही कधी वाचलेच नव्हते.पण हरी नरके सारख्या बुद्धिजीवी विचारवंतांनी त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा अभ्यास करून जगा समोर मांडला परंतु त्यावर व्यापक चर्चा होतांना दिसत नाही.ज्योतीराव फुले यांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामे वस्तु आजही लक्षवेधी आहेत पण त्यांची पाहिजे त्या प्रकारे दाखल घेतल्या जात नाही.
त्यांनी असंघटित कष्टकरी कामगार,मजुरांना कुशल कारागीर बनविले.त्यांच्या कडून ऐतिहासिक वास्तू निर्माण केल्या कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा कोणी बांधला?. कधी बांधला ?.या बाबत कोणी विचारत नाही.कारण या वर चर्चा सुरू झाल्यास आजच्या तरुणांना एक प्रेरणादायी सत्य इतिहास समोर येईल या भीतीने त्यावर चर्चाच होत नाही. लिहला जात नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतीराव फुलेंना गुरुस्थानी मानायचेच अनेकांना आज भी काळजाला झोबंते.त्यामुळे बाबासाहेब फुलेनां गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आज ही फुलेंच्या विचारांशी प्रामाणिक राहुन उठता बसता त्यांच्या विचाराला प्रतिमांना त्रिवार प्रणाम करतो.त्याशिवाय भाषण किंवा घरा घरातील कोणता ही कार्यक्रम सुरु होत नाही.
१९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, “जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वो ही थे.”  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना “समाज क्रांतिकारक” म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे. “मूह मे राम बगल मे सूरी ” या रीतीने गांधीवादी, सावरकरवादी आणि मनुवादी वागतांना दिसतात.
ज्योतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे ऐतिहासिक काम करून ठेवले म्हणून आज त्यांची फळ आपण मुक्तपणे चाखतो.
महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचाराचा वारसा आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे त्याला मराठा, ओबीसी मागासवर्गीय समाजाने खऱ्या अर्थाने साथ दिल्यास केंद्रात फुले शाहु आंबेडकर विचारांचे सरकार स्थापन होऊ शकते.
मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तर भारतात या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ठेवली आहे.पण काही मागासवर्गीय समाजातील गुलामांनी त्याला सुरुंग लावला होता.शत्रू पक्षाच्या विचारधारेच्या नेत्यांना केवळ आर्थिक लाभा करीता त्यांना संघटनेत सहभागी करून घेतल्यामुळे क्रांतिकारी विचारांचे कॅडर बेस संघटन मागे पडले आणि लीडर बेस लोक पुढे आले त्यामुळे पक्ष संघटनेवर परिणाम झाला.त्यांचे फळ आज उत्तर भारतीय जनता भोगत आहे.
व्यक्ती पेक्षा संघटन मोठे असते संघटने पेक्षा विचारधारा मोठी असते.फुले शाहु आंबेडकर विचार हे सर्वान पेक्षा मोठे आहेत. क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले आहेत.त्यांची विचारांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर क्रांतिकारी परिवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही.आज देशात जी परिस्थिती आहे.तिचा गांभीर्याने विचार करण्यासाठी महापुरुषांची क्रांतिकारी विचारधारच यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकते.पुण्यात प्लेगची साथ १८९७ सुरू झाली आणि सर्वत्र पसरली होती.आज देशात कोरोना हे महामारी संकट प्रचंड वेगात पसरत आहे.
१८९७ साली जाती व्यवस्था तिव्र होती.म्हणून लोक साथ देत नव्हते.आता देशात लोकशाही आहे.तरी काही लोक तिला न जुमानता रस्त्यावर फिरतांना दिसतात.राज्य व केंद्रातील राज्यकर्ते हात जोडून विनंती करीत आहे.पोलीस,डॉक्टर,नर्स आणि महानगरपालिका कामगार कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत.सावित्रीबाई फुले सारखी कोणी दिसत असेल तर त्याबद्दल चार चांगले शब्दात लिहून तीचे कौतुक करा.त्यांच्या बद्दल लिहा.त्यासाठी क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले पाहिजे.महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिना
निमित्त सर्व मराठा,ओबीसी मागासवर्गीय समाजाने म्हणजेच ब्राह्मणेतर समाजाने आपआपल्या समाजाच्या संघटनेचे वैचारिक आत्मचिंतन करून परीक्षण करणे आवश्यक आहे.लॉक डाऊन भूक बळी घेणारा ठरेल म्हणूनच घरात रहा,किंवा कामावर जा पण सुरक्षित रहा.हीच त्यांच्या स्मृतिदिना निमित्त सर्व बहुजन समाजा कडून अपेक्षा. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रणाम!!!.
 सागर रामभाऊ तायडे
मो. ९९२०४०३८५९,भांडुप, मुंबई
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओबीसींच्या प्रश्नांसाठी पाचोरा येथे तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन

Next Post

आदिवासी वस्तीवर संविधान दिनाचा जागर

Related Posts

महा सूर्याचा अस्त कधीच होत नसतो! पोलीस साहित्यिक विनोद अहिरे

महा सूर्याचा अस्त कधीच होत नसतो! पोलीस साहित्यिक विनोद अहिरे

December 5, 2024
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे ; ट्रेन व वेळापत्रक पहा

महा सूर्याचा अस्त कधीच होत नसतो ; ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे

December 5, 2023
वसंतराव मुंडे म्हणजे पत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता…

वसंतराव मुंडे म्हणजे पत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता…

December 31, 2020
विष्णूदास भावे आधुनिक मराठी रंगभूमीचे जनक

विष्णूदास भावे आधुनिक मराठी रंगभूमीचे जनक

November 4, 2020
अखिल भारतीय लेवा महिला समाज भुषण पुरस्कार सोहळा उत्साहात

अखिल भारतीय लेवा महिला समाज भुषण पुरस्कार सोहळा उत्साहात

November 4, 2020
‘जनता कर्फ्यू’ची आता खरी गरज !

‘जनता कर्फ्यू’ची आता खरी गरज !

May 15, 2020
Next Post
आदिवासी वस्तीवर संविधान दिनाचा जागर

आदिवासी वस्तीवर संविधान दिनाचा जागर

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us