मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधनाने झाले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सतीश कौशिक निधनाच्या काही तासांपूर्वी होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत
बुधवारी रात्री होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये जावेद अख्तर, बाबा आझमी, शबाना आझमी, तन्वी आझमी यांचासोबतच अली फजल आणि रिचा चढ्ढा देखील दिसत आहेत. जानकी कुटीर जुहू येथे होळीच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सतीश कौशिक यांनी कारकीर्द
हरियाणात जन्मलेले सतीश कौशिक अभिनेते, दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांना सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. मिस्टर इंडियामध्ये त्यांची कॅलेन्डरची भूमिका प्रचंड गाजली. सतीश कौशिक यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. सतीश कौशिक यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही शिक्षण घेतले.















