Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार

najarkaid by najarkaid
October 7, 2021
in Uncategorized
0
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 7 : गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन ठेवून त्यादृष्टीने काम करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा येत्या 5 वर्षातील दृष्टीकोन (प्रॉस्पेटिव्ह प्लॅन) कसा असेल यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त विरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अवर सचिव डॉ. श्री. पु. कोतवाल यांच्यासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आज राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असणारा निधी, कुशल मनुष्यबळ तसेच रुग्णालयाची उभारणी कशी करता येईल याबाबत नियोजन होणे आवश्यक आहे. केरळ, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक येथील राज्यात कुशल परिचारिका असतात आणि याची मागणी देशभरात असते. या परिचारिकांना काय वेगळे प्रशिक्षण दिले जाते, त्यांचा अभ्यासक्रम काय असतो, त्या राज्यांची परिचारिका महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे धोरण नेमके काय आहे याचा सुद्धा अभ्यास होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशातले महत्वाचे विद्यापीठ असून काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थी हित पाहून नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील पाच वर्षांचा विचार करीत असताना बदलत्या परिस्थितीनुसार आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रम, हॉस्प‍िटल मॅनेजमेंट, वेगवेगळया अभ्यासक्रमांतील रिसर्च, आयुष इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यावरही विद्यापीठाने भर द्यावा असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयांमध्ये परिचारिका, तंत्रज्ञ, लॅब टेक्निशिअन यांची नितांत आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येणाऱ्या 5 वर्षांच्या प्रॉस्पपेटिव्ह प्लॅनमध्ये परिचारिकांसाठी अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय क्षेत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या पूरक अभ्यासक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय संस्थांना संस्था सुरु करण्यास मान्यता देण्यात येतात. मान्यता देत असतानाचे निकष संस्था पूर्णपणे पाळत आहे का, संस्थेचे शैक्षणिक, पायाभूत आणि निकालांवर आधारित परीक्षण सुद्धा होणे आवश्यक आहे. मान्यता देण्यात आलेल्या संस्था नियमांनुसार काम करतात का हेसुद्धा पाहिले जाणे आवश्यक आहे. संस्थांना मान्यता देत असतानाचे निकष नेमके कसे ठरविले जातात, संस्थांना देण्यात येणाऱ्या नूतनीकरणासंदर्भात सुलभता याबाबतही निश्चित धोरण आवश्यक असल्याचे श्री

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील वाढत्या अमली पदार्थ सेवन, व्यवहारा विरुद्ध शासनानं उचललं कडक पाऊल….

Next Post

गुड न्यूज ; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्यात वाढ !

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या पार्श्वभूमीवर ; ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

गुड न्यूज ; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्यात वाढ !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us