Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडलेला जामनेर राज्यातील पहिला तालुका ठरणार –  पालकमंत्री ना. गिरीश महाजन

najarkaid live by najarkaid live
July 5, 2019
in जळगाव
0
प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडलेला  जामनेर राज्यातील पहिला तालुका ठरणार  –  पालकमंत्री ना. गिरीश महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

·        जळगाव, दि. 5 – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह राज्य शासानाच्या विविध योजनातंर्गत प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडलेला जामनेर हा राज्यातील पहिला तालुका ठरणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत जामनेर तालुक्यात 38.53 कोटी रुपये खर्चाच्या विविध गावांना जोडणाऱ्या 61.91 किमी लांबीच्या रस्त्यांचे भूमिपुजन आज पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते मालदाभाडी येथे बोलत होते.  याप्रसंगी आमदार चंदुलाल पटेल, जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनिता पाटील, उपसभापती सुरेश बोरसे, चंद्रकांत पाटील, जीतू पाटील, नगरसेवक डॉ. प्रशांत भोंडे, जे. के. चव्हाण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, तहसीलदार नामदेव टिळेकर, गटविकास अधिकारी अजय जोशी, डॉ. संजय पाटील, सरपंच रंगलाल पाटील, एस. यु. पाटील, आर. डी. पाटील यांचेसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. महाजन म्हणाले की, जामनेर तालुक्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी राज्य शासनाने 4 हजार कोटी रुपयांच्या भागपूर प्रकल्पास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे तालुका हिरवागार बनणार आहे. प्रधानमंत्री नरेद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचे व राज्याचे चित्र बदलणारे काम होत आहे. सध्याचा काळ हा देशासाठी उज्वल काळ असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, समाजातील सर्व घटकांतील नागरीकांसाठी शासन काम करीत आहे. सर्वसामान्य नागरीकांच्या हिताला प्राधान्य देताना केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरीकाला हक्काचे घर देण्याचा निश्चिय केलाआहे. त्याचबरोबर या घरात हर घर बिजली योजनेतून वीज, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय, नागरीकांना चांगले पिण्याचे पाणी, आयुष्यमान योजनेतंर्गत प्रत्येक नागरीकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे. या योजनांचा नागरीकांनी लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले तर शेतकरी सुखी होईल ही बाब लक्षात घेऊन शासन सिंचन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. बोदवड उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी पाझर तलावासाठी जागा उपलब्ध होईल तेथे पाझर तलाव बांधण्यात येतील असेही ना. महाजन म्हणाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडले जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचेही उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत आज जामनेर तालुक्यातील पुढील गावातील रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरणाच्या कामांचे भुमिपूजन पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.

  • अंबिलहोळ – इजिमा-42 ते अंबिलहोळ देवीचे रस्ता 3 किलो मीटर 236 लाख रुपये.
  • मालदाभाडी – नविदाभाडी-मालदाभाडी-प्ररामा-5 ते वाघारी 5.585 किलो मीटर 523 लाख रुपये.
  • काळखेडा – प्रजिमा-61 (वाघारी) काळखेडा – नागण 6 किलो मीटर 430 लाख रुपये.
  • तिघ्रे वडगाव- प्रजिमा-32 सामरोद ते वडगाव तिघ्रे 4.98 किलो मीटर 347 लाख रुपये.
  • पळासखेडा काकर- प्रजिमा 32 ते पळासखेडा काकर ते जिल्हाहद्द 1.54 किलो मीटर 124 लाख रुपये.
  • शेवगेपिंप्री- रामा-46-शेवगेपिंप्री-नांद्रा हवेली रस्स्ता 5.35 किलो मीटर 307 लाख रुपये.
  • वडगाव सद्दो- वडगाव सद्दो ते मांडवे बु. रस्ता 3.36 किलो मीटर 170 लाख रुपये मो
  • मोयगाव- प्ररामा-मोयगाव-भागदरा-शहापूर रस्ता 12.75 किलो मीटर 697 लाख रुपये.
  • पाळधी- पाळधी-खर्चाणे रस्ता 3.88 किलो मीटर 245 लाख रुपये.
  • भिलखेडा- रामा-42 ते भराडी-भिलखेडा रस्ता 4.26 किलो मीटर 418 लाख रुपये.
  • जोगलखेडा- जोगलखेडा फाटा ते जोगलखेडा रस्ता 1.49 किलो मीटर 82 लाख रुपये.
  • मालखेडा-मालखेडा ते अंबाडी दिगर रस्ता 6 किलो मीटर 294 लाख रुपये.
  • जांभोळ ते चिंचखेडा तर्फे वाकडी रस्ता 3.90 किलोमीटर 237 लाख रुपये

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कार्यकर्ते हीच नाथाभाऊंची ताकद आहे – एकनाथराव खडसे 

Next Post

जिल्ह्यात १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान १४४ (१) (२) कलम जारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जिल्ह्यात १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान १४४ (१) (२) कलम जारी

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us