पाचोरा, प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे कापूस खरेदी जिनींग मध्ये करताना पैसे घेऊन कापुस मोजनी करीता टोकन दिले जात असल्याचा आरोप काल आमदार किशोर धनसिंग पाटील यांनी केला होता. हा आरोप अत्यंत बिनबुडाचा असून शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचा भाग असलेल्या आदर्श कृर्षी उत्पन्न बाजार समिती ची प्रतिष्ठा मलीन करणारा आहे.सभापती म्हणून मी स्वतःहा शेतकऱ्या कडुन पैसे घेऊन टोकन दिले,व जिनींग मध्ये कापुस खरेदी झाला, असे सबळ पुराव्या निशी सिद्ध केल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईल अन्यथा आरोप सिद्ध न झाल्यास आमदार यांनी आपल्या आमदारकी या पदाचा राजीनामा द्यावा असे खुले आव्हान कृ.उ.बा. सभापती सतीश बापू शिंदे यांनी दिले आहे
तसेच यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले कि या आधीही मा. जिल्हाधिकारी जळगाव व मा.जिल्हा उपनिबंधक जळगाव तसेच संबंधित विभागांना वेळोवेळी पत्रव्यवहार चर्चा करून पाचोरा येथे भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) यांच्यामार्फत कापूस खरेदी केंद्र पूर्ववत सुरू केले. बाजार समिती पाचोरा भडगाव यांचेमार्फत कोरोनाविषाणूमुळे होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम शेतकऱ्यांचा कापूस मोजण्याकरिता फोनद्वारे नाव नोंदणी सुरु केली, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव यांचेमार्फत तालुक्यातून आजपर्यंत अंदाजे २ लाख क्विंटल विक्रमी कापूस खरेदी झालेली आहे. तसेच मागील 10 वर्षातील हा उच्चांक आहे. जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव यांनी एप्रिल महिन्यात सोशल डिस्टंसिंग पाळून मास्क व सॅनिटायजर चा वापर करून आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन 90 हजार क्विंटल भुसार या शेतीमालाची खरेदी केली व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ती काळजी घेऊन बाजार समिती व कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू असे बाजार समिती सभापती सतीश शिंदे यांनी यावेळी सांगितले
तसेच आमदार किशोर धनसिंग पाटील यांच्याच शिवसेनेच्या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीवर करोडो रुपयांचे कर्ज करण्यात आलेले असून शेतकऱ्यांच्या घामावर उभ्या असलेल्या या संस्थेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार यांनीच करून ठेवला आहे. एवढे सगळे पापे करून सुद्धा उजळ माथ्याने फिरणाऱ्या व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदाराने सत्तेच्या धुंदीतून शुद्धीवर यावे. पाचोरा भडगाव तालुक्यात बंधाबांधवर फिरून शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करावा. आमदारांनी नुसत्याच वल्गना करून जनतेच्या समस्या सुटत नाहीत याचे भान ठेवावे, असे सभापती सतिष शिंदे यावेळी म्हटले.