सातगाव डोंगरी,ता.पाचोरा -पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीत व सातगाव परिसरात अवैध धंदे बोकळावले आहेत त्यामुळे गावातील अनेकांना जीव गमवावा लागला आहे .हे धंदे त्वरित बंद करण्यात यावेत अशी मागणी सातगाव डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर अहिरे यांनी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन, विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपळगाव तसेच सातगाव डोंगरी परिसरात गावठी दारुभट्ट्या सर्रासपणे सुरू आहेत.अनेक तरूण व्यसनाधीन होत आहेत याचा परिणाम म्हणून २०/२५ वर्ष वयोगटातील सन २०२०/२४ आज पावेतो १८/२० मुले दारूच्या आहारी जाऊन तरुणपणीच मृत्यूमुखी पडले आहेत. यापुवीॅ पिंपळगाव पोलीस स्टेशनने काही वेळा कारवाया केल्याचे निदर्शनास झाले मात्र त्यानंतरही हे धंदे सुरुच आहेत.तरुण अकाली मृत्युमुखी पडल्याने अनेकांचे संसार मुले आई वडील उघड्यावर आले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहचा ? निर्माण झाला आहे.