Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ १० पदार्थांचा आहारात समावेश करा

tdadmin by tdadmin
August 15, 2021
in आरोग्य
0
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ १० पदार्थांचा आहारात समावेश करा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पावसाळा हा अनेक जणांचा अतिशय आवडता ऋतू. आल्हाददायक वातावरण आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ. मंद मंद पाऊस भूरभुरू लागला की, आपसूकच चटकदार पदार्थ खाण्याची ओढ लागते. परंतु पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात इन्फेक्शन, फ्लू आणि सर्दी होण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत आपल्या आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात. या पदार्थांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत होईल. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या 10 पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता.

हिरव्या मिरच्या
हिरव्या मिरचीमध्ये पिपेरिन असते, जे एक अल्कलॉइड आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटामिन सी आणि केचे समृद्ध प्रमाण देखील आहे. हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतट. तसेच, अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत करू शकतात. हिरव्या मिरच्या हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे उत्पादन उत्तेजित करून, वायू कमी करू शकतात, ज्यामुळे पचन सुधारते. यात अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील आहेत.

फळे
पीच, प्लम, चेरी, बेरी, डाळिंबासारखी हंगामी फळे जीवनसत्त्वे ए आणि सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. मात्र, रस्त्याच्या कडेला आधीच कापून ठेवलेली फळे आणि ज्यूस खाणे टाळा. स्वच्छ धुवून, ताजे कापलेले फळ आणि घरगुती बनवलेले ज्यूसच सेवन करा.

पेय
सूप, मसाला चहा, ग्रीन टी, मटनाचा रस्सा, डाळींचे सूप इत्यादी गरम द्रवपदार्थांचा आहारात समावेश करा. ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

भाज्या
हा दुधीचा हंगाम आहे. अशा स्थितीत दुधीपासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये पराठे, सूप, रायता आणि भाज्या इत्यदी स्वरुपात दुधीचे सेवन करू शकता. कच्च्या भाज्यांऐवजी उकडलेले सलाड खा. कारण या काळात कच्च्या भाज्यांवर सक्रिय बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते.

प्रोबायोटिक्स
आपले पोट निरोगी ठेवण्यासाठी दही, ताक, लोणची यासारख्या प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा. हे प्रोबायोटिक्स आतड्यात चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात, जे आतड्यातून खराब बॅक्टेरिया किंवा रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात.

प्रथिने
निरोगी प्रथिने आपल्या आहारात समाविष्ट केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे आपल्याला आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतात. दूध, मूग, मसूर, चणे, राजमा, सोया, अंडी आणि चिकन हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

आले आणि लसूण
आले आणि लसूण सर्दी आणि तापाशी लढायला मदत करतात. यात अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. त्यांच्यामध्ये दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. आल्याचा चहा घशातील वेदना कमी करण्यास मदत करू शकतो. हे घटक ग्रेव्ही, चटणी, सूप, चहा इत्यादीमध्ये मिसळता येतात.

मेथी
मेथी हा शरीराची ऊर्जा वाढवणारा घटक आहे. त्यात आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे असतात. हे ताप आणि पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास मदत करते.

हळद
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. यात अँटीऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल प्रभाव आहे, ते गॅस्ट्रिक अल्सर प्रतिबंधित करते आणि प्रतिकारशक्ती सुधारते.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड
ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीराला आवश्यक असणारे फॅटी अ‍ॅसिड आहेत. पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. अशावेळी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संसर्गाशी लढण्यास हे अ‍ॅसिड मदत करतात. यासाठी तुम्ही ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे समृद्ध प्रमाण असणारे मासे, अक्रोड, पिस्ता, चिया बियाणे, अंबाडी, इत्यादी खाऊ शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार :पालकमंत्री

Next Post

राज्यात पावसाचे पुन्हा पुरागमन ; ‘या’ ९ जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार

राज्यात पावसाचे पुन्हा पुरागमन ; 'या' ९ जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us