पाळधी,(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे साहाय्य पोलीस निरीक्षकसह पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्का बुक्की करत असतांना पोलिसांचे कपडे फाटले असल्याची तक्रार पोलीस कर्मचारी गजानन महाजन यांनी दिली असून पाळधी पोलीस स्टेशनला आरोपी राहुल गुलाब फुलझाडे यांच्या विरुद्ध आज 25 रोजी रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे धरणगाव पोलीस निरीक्षक श्री.देसले यांनी “नजरकैद” बोलतांना सांगितले .
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी राहुल गुलाब फुलझाडे हे आज सायंकाळी पाळधी येथील हॉटेल सुगोकी जवळून त्यांच्या खाजगी मोपेड वाहनाने भरधाव गाडी चालवत होते आरोपीच्या गाडीने जवळच असलेल्या शिडी ला धडक दिल्याने शिडी खाली पडली असता आम्ही पेट्रोलिंग करत असतांना राहुल फुलझाडे यास लॉकडाऊन काळात बिना माक्स चे फिरत असल्याचा व भरधाव वेगाने गाडी चालविण्या बाबत विचारणा केली असता आरोपी यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना व मला शिवीगाळ करीत धक्का बुक्की केल्याने कपडे फाटले अशी फिर्याद दिल्याने याप्रकरणी गुन्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे धरणगाव पोलीस निरीक्षक श्री.देसले यांनी “नजरकैद” बोलतांना सांगितले














