Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा!

najarkaid live by najarkaid live
June 6, 2023
in जळगाव
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा!
ADVERTISEMENT

Spread the love

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी पाळधी व जळगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच दूरध्वनी वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील मान्यवर नेत्यांपासून ते सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत हजारो लोकांनी सकाळपासूनच  शुभेच्छा  दिल्या.

सालाबादप्रमाणे पाळधीत जाहीर सभेला मोठी उपस्थिती 

वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी पाळधीत जाहीर सभा होतं असते यावर्षी ही भव्य जाहीर सभा पार पडली यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान  दिले.ते म्हणाले की, आम्ही चाळीस केला. लोकांनी मतदान केले नसते तर ते निवडून आले नसते.दरम्यान पाळधी गावासाठी २२ कोटी रुपयांची पाणीयोजना पूर्ण झाली असून धरणगावसाठीही पाणीपुरवठ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तेथे मोर्चा काढणाऱ्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात काय केले असा सवालही त्यांनी केला.आता शिवसेना -भाजपचा मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला. सभेस आमदार संजय रायमूलकर, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे सुभाष पाटील, संजय महाजन आदींनी मार्गदर्शन केले.

यांनी दिल्या दूरध्वनीवरून शुभेच्छा…

सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले. यासोबत मंत्री दादा भुसे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री सचिन पायलट केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुजर, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार खासदार श्रीकांत शिंदे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, खासदार सी. आर. पाटील, खासदार उन्मेश पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, भरत गोगावले, शहाजी बापू, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार एकनाथराव खडसे, अरुणभाई गुजराथी यांनी शुभेच्छा दिल्या.

पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांसाठी तब्बल २२ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ही सौर उर्जेवर चालणारी राज्यातील पहिली पाणी पुरवठा योजना आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. यानंतर ही योजना पूर्णत्वाकडेआली असून यातील जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून पाण्याची चाचणी शुभारंभ सोमवारी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना मंजुर करण्यात आलेल्या कृषी अवजारांची प्रातिनिधिक स्वरूपात कृषी खात्यातर्फे लहान व मोठे ट्रॅक्टर, कृषी अवजारे, बियाणे आदींचे तालुक्यातील अहिरे येथील शेतकरी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

पाळधी येथील श्रीराम मंदिरात बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिवसभरात ५८ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले. जी.एम. फाऊंडेशन आयोजीत नशिराबाद शिवसेनेतर्फे बांधकाम मजुरांना मोफत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमृत शहरे गटात भुसावळ नगरपालिकेने पटकाविला राज्यात तृतीय क्रमांक

Next Post

फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन

फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट - अनिल जैन

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us