Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाणी गळती थांबून मिळणार चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्याला पूर्ण दाबाने शेतीसाठी पाणी

najarkaid by najarkaid
October 11, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, (किशोर शेवरे) –  मतदारसंघातील वरखेडे लोंढे प्रकल्प हा केंद्र व राज्य शासन दोन्ही मिळून “बळीराजा जलसंजीवनी योजना” या योजनेमध्ये स्पेशल पॅकेज अंतर्गत समावेश आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाकडून रुपये ३६२ कोटी व राज्य शासनाकडून नाबार्ड बॅक यांच्याकडून कर्ज स्वरूपात रुपये २१४ कोटी निधी मंजूर आहे. सदर निधी हा जून २०२१ पर्यंत वापरण्याचे नियोजन असून याबाबत राज्य शासन व व केंद्र शासन यामध्ये करार देखील झालेला आहे. सदर नियोजनानुसार मुख्य धरणाचे काम माहे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार असून जून २०२० मध्ये प्रकल्पात पाणीसाठा करण्यात येणार आहे. वरखेडे बॅरेज प्रकल्पाची संपूर्ण सिंचन निर्मिती उद्दिष्ट हे चाळीसगाव तालुक्यातील २० गावे व भडगाव तालुक्यातील ११ गावे अशी एकूण ७५४२ हेक्टर सिंचन पारंपरिक कालवा सिंचन प्रणालीद्वारे प्रस्तावित असून अद्याप कालव्याचे कोणतेही काम व भूसंपादन झालेले नाही. पारंपारिक कालवा प्रणाली ऐवजी वरखेडे प्रकल्पाच्या संपूर्ण सिंचन प्रणालीचे काम उपसा सिंचन अनुसरून बंदिस्त पाईपलाईन प्रणालीद्वारे केल्यास शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी बचत होणार आहे व त्यानुसार सिंचन केल्यास खऱ्या अर्थाने गोरगरीब व सामान्य शेतकरी यांना सदर प्रकल्पाचा सिंचनाचा फायदा मिळणार आहे. उपसा सिंचन अनुसरून बंदिस्त पाईपलाईन प्रणालीद्वारे त्यासाठी संबंधितांना विहित कालमर्यादेत प्रकल्प अहवाल तयार करून सक्षम मान्यता घेऊन कार्यान्वित करणे बाबत आदेश करावेत अशी विनंती चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पारंपरिक पद्धती एवजी बंदिस्त पाईपलाईन कालवा केल्यास ४५० हेक्टर जमिनी भूसंपादनासाठी लागणारा २५० ते २८० कोटी खर्च वाचणार
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, सदर प्रकल्प हा केंद्र शासनाचा “स्पेशल पॅकेज” योजनेमध्ये समाविष्ट असल्याने केंद्र व राज्य शासनामध्ये झालेल्या MOU नुसार जून-२०२२ पर्यंत सिंचन निर्मिती उद्दिष्ट करणे बंधनकारक आहे. या प्रकल्पाची लाभक्षेत्रातील जमीन अत्यंत सुपीक व कसदार आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांची जमीनधारणा (Land Holding) कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी कालवा भूसंपादनामुळे भूमिहीन होणार आहे. या प्रकल्पाचा उजवा मुख्य कालव्याची लांबी ४० किमी व वितरिका, उपवितरीका शेतचारी इत्यादी यांची एकूण लांबी १३० किमी असून एकूण कालव्यासाठी तब्बल ४५० हेक्टार जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. त्यासाठी राज्य शासनास ६० ते ७० लक्ष प्रती हेक्टर दर प्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक सुमारे रुपये २५० ते २८० कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच सदर भूसंपादन प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया व इतर कारणामुळे दीर्घकाळ रेंगाळून वर्षानुवर्ष चालत राहून प्रकल्पाच्या खर्चातही तिप्पट व चौपट वाढ होते. त्यामुळे वरखेडे प्रकल्पाची संपूर्ण वितरण प्रणाली बंदिस्त पाईपलाईनद्वारे प्रस्तावित केल्याने भूसंपादनावरील खर्च पूर्णपणे वाचणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जमीन अधिग्रहणासाठी लागणारा वेळ, शेतकऱ्यांचा विरोध यामुळे प्रकल्प रखडतो. त्यामुळे वेळ वाचवून प्रकल्प विहित कालावधी मध्ये पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
पाणी गळती थांबून मिळणार शेवटच्या शेतकऱ्याला पूर्ण दाबाने शेतीसाठी पाणी
बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा केल्यास पाण्याची होणारी गळती थांबून शेवटच्या उपवितरीकातील शेवटच्या शेतकऱ्याला सारख्या दाबाने पाणी मिळेल तसेच शेतकऱ्यांच्या लागवड क्षेत्रानुसार त्यांना किती पाण्याची आवश्यकता आहे त्याच प्रमाणात पाणी वाटप होऊन पाण्याची बचत होईल याकडेही आमदार मंगेश चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हाथरस प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा : बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन

Next Post

आईच्या वाढदिवसाला आईचे औक्षण करत दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे घातलं साकडं

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
आईच्या वाढदिवसाला आईचे औक्षण करत दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे घातलं साकडं

आईच्या वाढदिवसाला आईचे औक्षण करत दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे घातलं साकडं

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us